Apalya Mulanchya Samasya Ani Upay By Nasreen Patel (आपल्या मुलांच्या समस्या आणि उपाय)
Apalya Mulanchya Samasya Ani Upay By Nasreen Patel (आपल्या मुलांच्या समस्या आणि उपाय)
Couldn't load pickup availability
या पुस्तकामध्ये लेखिकेने आधुनिक युगातील पालकांसाठी सुयोग्य मार्गदर्शन केले आहे. मुलांमध्ये समस्या उद्भवल्यानंतर काय करायला हवे, याबद्दल सविस्तर ऊहापोह केला आहे. मूल होण्याआधी जर पालकांनी या पुस्तकाचे वाचन केले तर पालकत्व ही समस्या न ठरता पालकत्वातील सुखाची अनुभूती त्यांना येऊ शकेल, अशी माझी धारणा आहे." - डॉ. श्रीकांत चोरघडे, बालरोगतज्ज्ञ “मुलांच्या समस्यांची मानसिक, सामाजिक तसेच मनोवैज्ञानिक अशी अनेक कारणे असतात, त्यांच्या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर नसरीन पटेल यांनी पुस्तकरूपात पालक व वाचकांसाठी एक महत्त्वाची कलाकृती उपलब्ध करून दिली आहे. मुलांच्या समस्या व त्यावरील उपाय अत्यंत ओघवत्या शैलीत आणि प्रभावीपणे त्यांनी मांडले आहेत. मराठीत या विषयावर त्यामानाने लेखन कमी आहे, तेव्हा हे पुस्तक वाचकांच्या व पालकांच्या नक्कीच उपयोगाचे ठरेल." - डॉ. संजीव सावजी, न्यूरो-सायकॅट्रिस्ट “आधुनिक जगातील वाढती स्पर्धा, गतिमान जीवन आणि संगणकाचा वाढता प्रभाव यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे यात मार्मिका चित्रण केले आहे. प्रकरणांमध्ये मांडलेले पालकांचे विविध प्रकार, शालेय मुलांचे शैक्षणिक, भावनिक वर्तन आणि इतर समस्यांमधून लेखिकेच्या सखोल व चिंतनशील अभ्यासाचा प्रत्यय येतो. एकूणच बदलत्या जगातील पालक-बालक व विद्यार्थी यांच्यातील संबंध मित्रत्वाचे होण्याच्या दृष्टीने हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक व उपयुक्त ठरला." - डॉ. मोहन आगाशे, मानसोपचारतजा आणि प्रसिद्ध अभिनेता
Share
