Apal Jivant Sanvidhan By Shashi Tharoor (आपलं जिवंत संविधान -संक्षिप्त ओळख आणि भाष्य)
Apal Jivant Sanvidhan By Shashi Tharoor (आपलं जिवंत संविधान -संक्षिप्त ओळख आणि भाष्य)
Couldn't load pickup availability
सार्वजनिक चर्चाविश्वात अभ्यासू हस्तक्षेप करणारे लेखक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शशी थरूर यांनी प्रस्तुत पुस्तकात भारतीय संविधानाचा समकालीन संदर्भामध्ये संक्षिप्त आढावा घेतला आहे. यामध्ये ते उद्देशिकेपासून सुरुवात करत संविधानाच्या विविध भागांचा परिचय करून देतात आणि मग त्यांचा ऐतिहासिक मागोवा घेतात. भारताच्या संविधानकर्त्यांना अपेक्षित असणाऱ्या नागरी राष्ट्रवाद या संकल्पनेचाही सखोल वेध थरूर यांनी घेतला आहे. संविधानातील पुरोगामित्व, अनेकत्ववाद, सहिष्णुता, उदारमतवाद व सामूहिकतेसह व्यक्तिमूल्य जपण्याला प्राधान्य, अशा वैशिष्ट्यांचाही ऊहापोह प्रस्तुत पुस्तकात सापडेल. एकाधिकारशाही वृत्तीच्या व धार्मिक कट्टरतावादी असणाऱ्या घटकांकडून संविधानाच्या पायाभूत संरचनेत बदल करायचे प्रयत्न झाले तरी, संविधानाचा गाभा या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी सक्षम असल्याचं प्रतिपादन थरूर करतात. परंतु, यासाठी नागरिकांनी संविधानातील पायाभूत तत्त्वांशी संवाद साधत त्याकरता संघर्ष करण्याची तयारी ठेवायला हवी. भारतीय संविधान हे जगातील सर्वांत मोठं लिखित संविधान आहे. भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा लोकशाही देश आहे. परंतु, सध्या या देशातील लोकशाही आणि तिला आधारभूत ठरणारं संविधान या दोन्हींपुढे विविध आव्हानं निर्माण झाली आहे. त्या आव्हानांना सजगपणे सामोरं जाण्याचं आवाहन थरूर ‘आपलं जिवंत संविधान’ या पुस्तकातून करतात.
Share
