Skip to product information
1 of 1

Anuurja By Atul Kahate (अणुऊर्जा)

Anuurja By Atul Kahate (अणुऊर्जा)

Regular price Rs. 238.00
Regular price Rs. 280.00 Sale price Rs. 238.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

अणु ही या विश्वामधली सगळ्यात सूक्ष्म गोष्ट आहे हे कळल्यापासून माणसाला अणुविषयीच्या संशोधनानं पार बेचैन करून सोडलं होतं. ठिकठिकाणचे शास्त्रज्ञ अणुविषयीच्या संशोधनामध्ये पार गुंतून गेले. त्यातून अणु हा या विश्वामधला सगळ्यात सूक्ष्म कण नसून अणुच्या पोटात आणखी अतिसूक्ष्म कण असतात असं लक्षात आलं. तसंच अणुच्या पोटातले हे कण बाहेर काढता काढता काही ठरावीक पदार्थांच्या बाबतीत ही प्रक्रिया प्रचंड मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर टाकते असंही दिसून आलं. हीच ती अणुऊर्जा.

अणुबॉम्बची निर्मिती केल्यानंतर अणुमधल्या ताकदीचा विध्वंसाकरता वापर करता करता तिचा वापर शांततामय मार्गांसाठी करता येईल का या गोष्टीवर शास्त्रज्ञांनी काम केलं. त्यातून अणुऊर्जेचं जाळं जगभरात विणण्यात आलं. हळूहळू त्यामधला फोलपणा दिसून आला असला, तरी अणुऊर्जानिर्मितीविषयीच्या फायद्यांविषयी अनेक अफवा जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या. अणुऊर्जा स्वस्त, स्वच्छ, पर्यावरणाला पूरक आणि निर्धोक असते असं वारंवार सांगण्यात आलं. यामधला खोटेपणा उघडपणे दिसून येत असला, तरी लोक अणुऊर्जेचा पाठपुरावा करतच असतात.

अणुऊर्जेचं तंत्रज्ञान अगदी सोप्या भाषेत उलगडून दाखवणारं, त्यामधल्या सगळ्या धोक्यांची सखोल माहिती अगदी सामान्य वाचकालासुद्धा समजेल अशा भाषेत सांगणारं आणि अणुऊर्जेसंबंधीच्या सत्याचा उलगडा करणारं हे पुस्तक आहे. त्यात एका सर्वसामान्य नागरिकाला आपल्या पर्यावरणाविषयी आणि भविष्याविषयी वाटणारी कळकळ पानोपानी दिसेल आणि विनाशकारी अणुऊर्जेचा राक्षस परत बाटलीतच बंद का केला पाहिजे यामागचं कोडंही उमगेल.

View full details