Skip to product information
1 of 2

Antarrashtriya Sambandh ani Samarikshastra By Shrikant Paranjape (आंतरराष्ट्रीय संबंध व सामारिकशास्त्र)

Antarrashtriya Sambandh ani Samarikshastra By Shrikant Paranjape (आंतरराष्ट्रीय संबंध व सामारिकशास्त्र)

Regular price Rs. 638.00
Regular price Rs. 750.00 Sale price Rs. 638.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

या पुस्तकाद्वारे विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी आंतरराष्ट्रीय संबंध, सामरिक शास्त्र आणि सुरक्षा अभ्यासांमधील विविध संकल्पना, मुद्दे, वादविवाद आणि इतर घडामोडी या एकत्र मांडण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या प्रकरणात राष्ट्र-राज्य, राष्ट्रीय शक्ती, राष्ट्रीय सुरक्षा इत्यादी विविध संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या संकल्पना आपल्याला युद्ध आणि शांतता, अंतर्गत सुरक्षा, प्रादेशिकता, आण्विक रणनीती इत्यादी मुद्द्यांचे विश्लेषण करण्यास मदत करतील. दुसर्या  प्रकरणात युद्ध आणि संघर्ष व्यवस्थापन आणि संघर्ष निराकरणाच्या दृष्टिकोनांवर लक्ष केंद्रित केले आहे. तिसर्या प्रकरणात दुसर्या महायुद्धाच्या समाप्तीपासून विकसित झालेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास केला  आहे. अशी आशा आहे की, यातील घटना आणि प्रवाहांचे विश्लेषण हे जगात घडलेल्या विविध घडामोडींचा दृष्टिकोन मांडण्यास मदत करेल. चौथ्या प्रकरणाचा उद्देश विद्यार्थ्यांना विविध प्रादेशिक संघटनांशी ओळख करून देणे हा आहे. पाचव्या प्रकरणात विविध देशांच्या सामरिक नीति  आणि आण्विक रणनीतींच्या उत्क्रांतीचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटच्या प्रकरणात काही समकालीन सुरक्षा समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी मागील प्रकरणांमध्ये झालेल्या चर्चेचा आधार म्हणून वापर करण्याचा प्रयत्न केला आहे.
हे संशोधन प्रकाशन नाही, तर एक पाठ्यपुस्तक आहे जे विद्यार्थी आणि अभ्यासकांना या विषयाची मूलभूत परिचयात्मक माहिती  प्रदान करेल. विद्यार्थी याचा वापर मूलभूत वाचन म्हणून करू शकतात, ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामारिकशास्त्राच्या अभ्यासातील संकल्पना, मुद्दे आणि प्रवाह  समजण्यास मदत होईल. आंतरराष्ट्रीय संबंध, राज्यशास्त्र, सुरक्षा अभ्यास, सामरिकशास्त्र इत्यादी विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणार्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित सार्वजनिक परीक्षा देणार्यांना देखील या पुस्तकाचा उपयोग होईल.

 

 

 

View full details