Skip to product information
1 of 1

Antahin Akash By Dr. Ramesh Jalataare (अंतहीन आकाश- डॉ. रमेश जलतारे)

Antahin Akash By Dr. Ramesh Jalataare (अंतहीन आकाश- डॉ. रमेश जलतारे)

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 260.00 Sale price Rs. 200.00
23% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

अंतहीन आकाश- डॉ. रमेश जलतारे

महानगरातील कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या जीवन संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण करणारी, उत्कंठावर्धक नवीकोरी कादंबरी, ' अंतहीन आकाश ' .
प्रस्तुत कादंबरीत मध्यमवर्गीय समाजाची होणारी सासेहोलपट , त्यांचा विविध प्रश्नांसाठीचा संघर्ष,त्यात मुलांचे शिक्षण ,भविष्य , आरोग्य आणि पैशांची होणारी ओढाताण यामुळे मध्यमवर्गीय मनुष्य आपलेआयुष्य प्रश्नांचे आकाश समजूनच जगत असतो. ही सामाजिकता अतिशय मार्मिकपणे व स्पष्टपणे डॉ. रमेश जलतारे यांनी त्यांच्या कादंबरीतून मांडलेली आहे.रमेश जलतारे हे कवी लेखक आणि समाजचिंतक आहेत. समाजातील समकालीन मूल्य पकडून त्यावर ते मार्मिक भाष्य करतात. या कादंबरीमध्ये देखील त्यांनी व्यवस्थेला अनेक प्रश्न विचारले आहेत.
    रघुनाथराव हे या कादंबरीतील महत्वाचे पात्र आहेत.मुंबईतील एका चाळीत राहून ते आपल्या संसाराचा गाडा कसा ओढतात? काय काय संघर्ष करावा लागतो, आणि शेवटी हाती काय लागते, याचे उत्तम चित्रणात कादंबरीत आहे. वाचकांना निश्चित ही कादंबरी खिळवून ठेवते. अत्यंत ओघवत्या शैलीत वेगवान प्रसंगांची मालिका ही या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. वाचताना पहिल्या प्रकरणापासून अखेरच्या प्रसंगापर्यंत उत्कंठा कायम राहते. 
 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊन गेला तरीही अजून सामान्य माणसांचे प्रश्न का सुटत नाहीत? हा डोळ्यात अंजन घालणारा प्रश्न त्यांनी या कादंबरीतून पुढे आणलेला आहे. 
वाचनीय , वाचकाला विचार करायला लावणारी ही कादंबरी आहे. यात त्यांनी कोठेही कल्पनेच्या भराऱ्या मारलेल्या  नाहीत तर सर्वच पात्रांच्या माध्यमातून एक सामाजिक चिंतन, काही सामाजिक प्रश्न पुढे आणलेले आहेत.
        या सर्वांच्या जोडीला कोवळ्या वयातील एक हृदयस्पर्शी, हळवी प्रेमकहाणी आणि चित्तथरारक रहस्याची बेमालूमपणे केलेली गुंफण हे या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल . वास्तवतेचे दर्शन कथानकातून होत असले तरी, कादंबरी कुठेही कंटाळवाणी होत नाही. घरातील आबालवृद्धांनी एकत्र बसून वाचावी असे कथानक आणि मांडणी लेखकाने केलेली आहे. विशेषतः वृद्ध आणि आजारी आई आणि वडिलांच्या काळजीने स्वतःच्या प्रेमाला तिलांजली देण्यासाठी सिद्ध असलेला नायक हे उत्तम संस्कारात वाढलेल्या व्यक्तीचे चित्रण मनाला चटका लावून जाते. 
अल्पावधीत ही कादंबरी सर्वसामान्य वाचक वर्गात लोकप्रिय होईल यात शंका नाही.

View full details