Andhar Sawalya By Shailesh Deshpande (अंधार सावल्या)
Andhar Sawalya By Shailesh Deshpande (अंधार सावल्या)
Couldn't load pickup availability
अंधार
म्हणजे सत्य असत्य, भास आभास, विश्वास अविश्वास, जीवन मृत्यू आणि काळोख ते प्रकाश या दरम्यानची एक अंतहीन अगम्य पोकळी. या अंधाराची सुरुवात कोठे होते आणि अंत कोठे होतो. हे एक न उलगडणारे कोडे आहे. कदाचित दूरवरून कुठूनतरी येणाऱ्या प्रकाशाचे कवडसे पिऊन, तो स्वतःला अधिक अधिक गडद करत राहतो.
अंधार
जो फक्त डोळ्यांना दिसतो तेवढाच मर्यादित आहे की, त्याही पलीकडे त्याचे एक स्वतंत्र रहस्यमय साम्राज्य आहे. आपल्या आजूबाजूच्या अशा अगणित गोष्टी आहेत, ज्या त्या अंधारात गुडूप होऊन जातात. मग त्यांचा शोध ना त्यांना स्वतःला घेता येतो, ना आपल्याला घेता येतो.
अंधार
जो स्वतः प्रमाणेच गुढ आहे. विक्राळ आहे आणि तितकाच क्रूर आहे. अगणित विशालकाय राक्षसांना सहज गिळून टाकावे इतकी त्याची भूक आहे. त्याच्या गर्भात लपलेल्या हजारो, करोडो, असंख्य सावल्या, सतत अंधाराचे प्रतिनिधी बनून, आपल्या आजूबाजूला वावरत असतात. मात्र त्या अंधाराची तीव्रता इतकी तीव्र असते की, प्रकाशातही त्या सावल्या आपल्याला ओळखता येत नाहीत. मग त्याच सावल्या अंधार सावल्या होऊन आपल्या आयुष्यात येतात. आणि मग सुरू होतो खेळ... जीवनाचा आणि अंधार सावल्यांचा खेळ..
Share
