Anand By V. V. Shirwadkar (आनंद)
Anand By V. V. Shirwadkar (आनंद)
Couldn't load pickup availability
शिरवाडकरांनी आपल्या नाट्यलेखनासाठी अनेक स्रोत वापरले. शेक्सपीअर, टॉलस्टॉयसारख्या थोरांच्या कृती, रामायण-महाभारतसारखी महाकाव्ये, पारसनीसांनी लिहिलेला इतिहास आणि आनुई, ऑस्कर वाईल्ड, मॅटरलिंकसारख्यांची नाटके. उत्तरायुष्यात चित्रपट न पाहणाऱ्या शिरवाडकरांनी योगायोगाने ‘आनंद’ चित्रपट पाहिला आणि त्याने त्यांच्या मनावर गारूड केले.
‘आनंद’ चित्रपट हृषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला आणि त्याची कथाही त्यांनीच लिहिलेली. ‘मरणासमोर उभे असताना, एक मनुष्य हसतखेळत भोवतालच्या जीवनात सुखाच्या लहरी निर्माण करत आपला अस्तकाळ एका बेहोष धुंदीत व्यतीत करतो, ही कल्पना त्यांना हृद्य वाटली. ह्या कथावस्तूवर स्वतःच्या काव्यात्म प्रतिभेचे संस्कार करत शिरवाडकरांनी एक भव्य नाट्यवस्तू निर्माण केली.
हे पुस्तक १९७६ साली प्रसिद्ध झाले. नाटकाची ही शिरवाडकर जन्मशताब्दी विशेष आवृत्ती. संहिता आणि नाट्यप्रयोग यांविषयी लेखक, प्रकाशक आणि नाट्यकर्मी रवी पटवर्धन यांची टिपणे यात दिली आहेत.
Share
