Anakarvilhe By Prashant Bagad (अनाकारविल्हे)
Anakarvilhe By Prashant Bagad (अनाकारविल्हे)
Couldn't load pickup availability
अनाकारविल्हे
“असंही असेल की मी कबुलीजबाब देत असायचो. जरा वेगळ्या प्रकारचा कबुलीजबाब : जे खरं असत असे ते मी खरेपणाने सांगत असे. मी खरोखर मित्राकडे जात असे आणि मी म्हणत असे, “मित्राकडे जातोय.” मी खरोखर राममंदिराकडे जात असे आणि म्हणत असे, “राममंदिराकडे चाललोय.” मी गृहपाठाची वही आणायला जात असे आणि तेच सांगत असे. माझ्या कृतीत आणि म्हणण्यात फक्त दुहेरी अवतरणचिन्हांचा फरक राहत असे. माझ्या चालण्याचं, येण्याजाण्याचं, काही करण्याचं वर्णन मी इतक्या साध्या, इतक्या नेहमीच्या, इतक्या सर्वजन पद्धतीने करत असे की त्या वर्णनाच्या सत्यतेने माझा कंठ दुखू लागत असे. मी आरपार प्रामाणिक होऊन जात असे. सत्य उच्चारताना, माझं वर्णन करताना मी निखळ होऊन जात असे. माझा कंठ दाटून येई तो अशा खरेपणामुळे, खर्याच्या कबुलीमुळे. सांगताना माझ्या डोळ्यांत पाणी येईल की काय असं समोरच्याला वाटून जात असे. “मी मित्राकडे चाललोय असाच गप्पा मारायला,” असं सांगताना माझ्या दोन्ही हातांवर आलेला सत्याचा शहारा मला जाणवत असे. सत्य साधं असतं किंवा सत्य साधेपणाच्या पायावर स्थित असतं याचा हा प्रत्यय असे बहुधा.”
Share
