Alijah Bahaddar Mahadaji Shinde (अलिजाह बहाद्दर महादजी शिंदे)
Alijah Bahaddar Mahadaji Shinde (अलिजाह बहाद्दर महादजी शिंदे)
Couldn't load pickup availability
Alijah Bahaddar Mahadaji Shinde (अलिजाह बहाद्दर महादजी शिंदे)
लेखिका – आरती जगताप
मराठ्यांच्या पराक्रमाचा धगधगता इतिहास, मुत्सद्देगिरीचे अद्वितीय कौशल्य आणि पराभवाच्या राखेतून सामर्थ्यशाली सत्ता उभी करण्याची जिद्द म्हणजे महादजी शिंदे!
पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर विस्कळीत झालेल्या मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी देणाऱ्या महादजी शिंदे यांनी उत्तर भारतात मराठ्यांचा दरारा निर्माण केला. रणांगणावरील शौर्य, आधुनिक लष्करी संघटनेची उभारणी, राजकीय डावपेच आणि दिल्लीच्या राजकारणावरील प्रभाव यांच्या बळावर त्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासात अढळ स्थान निर्माण केले. मुघल बादशहाच्या दरबारात त्यांना मिळालेला ‘वकील-इ-मुतलक’ हा सन्मान त्यांच्या प्रभावाची साक्ष देतो.
हे पुस्तक एका पराक्रमी सेनानीची कथा सांगतानाच त्यांच्या संघर्ष, दूरदृष्टी, राष्ट्रनिष्ठा आणि कर्तृत्व यांचा वेध घेते. महादजी शिंदे यांचे जीवन म्हणजे संकटांवर मात करून इतिहासाला नवी दिशा देण्याची प्रेरणादायी गाथा!
Share
