Aivaj + Directors 2 book set ( २ पुस्तकांचा संच )( लेखक - अमोल पालेकर, दीपा देशमुख)
Aivaj + Directors 2 book set ( २ पुस्तकांचा संच )( लेखक - अमोल पालेकर, दीपा देशमुख)
ऐवज - अमोल पालेकर!
अमोल पालेकर यांच्या कला कारकिर्दीचा ‘ऐवज’ वाचकांच्या हाती!
हे पुस्तक केवळ एका कलाकाराचा प्रवास नाही; हे एका माणसाचं आत्मचिंतन आहे. यातून आपण जीवनातील साधेपणाचं सौंदर्य आणि स्वाभिमानाची ताकद अनुभवतो."
"कलावंत म्हणून ते केवळ भूमिका साकारत नव्हते, तर समाजाला विचार करायला लावणारी कला निर्माण करत होते."
सिद्ध चित्रकार, अभिनेता-दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऐवज’ या आत्मकथनपर मराठी पुस्तकाचे प्रकाशन!
यानिमित्ताने स्वत:चा वेगळा चेहरा निर्माण केलेल्या एका मनस्वी मराठी कलाकाराची नवी ओळख वाचकांना होणार असून पालेकर यांच्या कलात्मक प्रवासाला आकार देणाऱ्या अनुभवांचा तपशील वाचकांना समृद्ध करणारा ठरेल.पालेकर यांच्या आत्मकथनातून भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील काही मौल्यवान क्षणचित्रे गवसतात. व्यक्तिगत आठवणी, दुर्मीळ छायाचित्रे आणि सत्यदेव दुबे, बादल सरकार, हृषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी, जयदेव वर्मा अशा नाट्य-चित्रपट जगतातील दिग्गजांना पालेकर यांनी अर्पण केलेले श्रद्धांजलीपर मनोगत समाविष्ट करण्यात आले आहे. पुस्तकामध्ये दिलेल्या ‘क्यूआर कोडमुळे पालेकर यांच्या कलाकृती बघण्याची संधी वाचकांना लाभणार आहे...!!