Aitihasik Wade Va Gharani By Sumit Dengale (ऐतिहासिक वाडे व घराणी)
Aitihasik Wade Va Gharani By Sumit Dengale (ऐतिहासिक वाडे व घराणी)
Couldn't load pickup availability
छत्रपती शिवरायांचे सरसेनापती माणकोजी दहातोंडे ते शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांचे कारभारी त्रिंबकजी डेंगळे यांच्यापर्यंतची मराठेशाहीतील काही वाडे आणि घराण्यांचा समावेश या पुस्तकात केला आहे.
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील मराठेशाहीच्या काळातील अनेक प्रसिद्ध-अप्रसिद्ध वाडे आणि घराण्यांचा अभ्यासपूर्ण वेध घेणारा दस्तऐवज म्हणजे ‘ऐतिहासिक वाडे व घराणी’ हे पुस्तक.
मराठेशाहीच्या वेगवेगळ्या काळातील, वेगवेगळ्या शासकांच्या पदरी असणारी, वेगवेगळ्या जाती-धर्माची घराणी यामध्ये आहेत.
सरदार, शास्त्री-पंडित, शाहीर, वतनदार, पाटील-देशमुख, सावकार, आदिवासी समूहाचा नाईक इत्यादी घराण्यांचा आणि त्यांच्या वाड्यांचा माहितीपूर्ण वेध या पुस्तकात घेतला आहे.
वाडे आणि त्यांचे स्थापत्य, त्यांचा संदर्भासहित इतिहास, स्वतः लेखकाने काढलेल्या दीडशेहून अधिक दुर्मिळ वस्तूंचे आणि वाड्यांच्या छायाचित्रांचा समावेश यात आहे.
काही प्रचलित दंतकथा, आख्यायिका, नातेसंबंध आणि परंपरा, वर्तमानातील वाड्यांची स्थिती, मन अस्वस्थ करणारे वास्तव आणि काही रंजक किस्सेही या पुस्तकाचे आकर्षण आहे.