Skip to product information
1 of 1

Aisi Ratne Melvin By Narayan Dharap (ऐसी रत्ने मेळवीन)

Aisi Ratne Melvin By Narayan Dharap (ऐसी रत्ने मेळवीन)

Regular price Rs. 213.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 213.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Quantity

“तुम्ही माझ्याविरुद्ध लढा पुकारला आहे! स्वत:च्या शक्तीचा अदमास न घेता गगनाला गवसणी घालायला निघाला आहात! मूर्ख! ज्याच्यामागे तुम्ही दोघे आता कोकरासारखे मुकाट्याने चालत आहात, तो कोण आहे पाहा!
एकाएकी सर्वत्र दिव्यांचा झगझगाट झाला. अंधाराला सरावलेले माझे डोळे एकदम दिपून गेले. जरा वेळाने मला जेव्हा सर्वकाही स्पष्ट दिसायला लागले तेव्हा मी समोर पाहिले.
आम्ही एका फरसबंदी चौकात उभे होतो. समोरच प्रखर दिवे होते, त्यामुळे त्यामागचा भाग दिसत नव्हता. जेवढा भाग प्रकाशित होता तेवढ्या भागात मला शिवभक्त दिसले नाहीत; पण आणखी काहीतरी दिसले.
आमच्याकडे पाठ करून एक ओळखीची वाटणारी आकृती समोर उभी होती. मागाहून दिसायला अगदी डॉक्टर कोतवालांसारखीच ती व्यक्ती दिसत होती; पण एका विलक्षण कल्पनेने माझी छाती धडधडायला लागली होती.
काही आवाज न करता ती व्यक्ती स्वत:भोवती फिरली; पण आमच्याकडे वळली तरी तिला चेहराच नव्हता. कोट आणि पीक कॅप यांच्यामध्ये काहीही नव्हते- केवळ मोकळी हवा होती...
एक सेकंदभर तिकडे पाहून सुमित्रा एकदम किंचाळली.
आमच्या डोळ्यांसमोर तो आकार पाहता पाहता विरघळला आणि नाहीसा झाला! एका फसव्या, काल्पनिक आकृतीमागे लागून आम्ही पार त्याच्या मुठीत सापडलो होतो!
आणि तिकडे डॉक्टर कोतवाल आम्हाला शोधत असतील, आम्ही दिसलो नाही तर आमची काळजी करीत असतील!”
...प्रस्तुत पुस्तकातून

View full details