AI cha Tufan By Atul Kahate (एआयच तुफान)
AI cha Tufan By Atul Kahate (एआयच तुफान)
Couldn't load pickup availability
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात एआय तंत्रज्ञानाने गेल्या काही वर्षांमध्ये अभूतपूर्व
धुमाकूळ घातलेला आहे. सर्वसामान्य माणसापासून मोठमोठे उद्योगपती आणि सत्ताधीश
यांच्यापर्यंत सगळ्यांना या ना त्या कारणामुळे एआयची दखल घेणे अपरिहार्य झाले आहे.
एआयविषयी माहीत नसलेला माणूस आजच्या आणि उद्याच्या जगात कालबाह्य ठरणार
याविषयी अजिबात शंका नाही.
या पार्श्वभूमीवर मराठीमध्ये एआय या विषयाचा सखोल आढावा घेणारी खूप कमी पुस्तके
आहेत. बहुतेक वेळा एआयचा जुना इतिहास किंवा एआयमुळे कोणत्या क्षेत्रांमध्ये कोणते
बदल घडणार अशा प्रकारचा मजकूर त्यात असतो. एआय म्हणजे नेमके काय, ते नेमके
कसे चालते, ते मानवी बुद्धिमत्तेशी कशी स्पर्धा करू शकते, या तंत्रज्ञानाच्या मुळाशी नेमके
काय असते, कुणाचे संशोधन यामागे आहे, यामध्ये गणिताची भूमिका नेमकी काय असते
अशा असंख्य गोष्टींचा अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत आढावा घेण्यासाठी या पुस्तक
मालिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामुळे अगदी सर्वसामान्य वाचकालाही या
विषयाची सखोल ओळख होईल.
मालिकेच्या पहिल्या पुस्तकात एआयच्या सुरुवातीपासून त्याचा प्रवास अगदी
आजच्या चॅट जीपीटीपर्यंत कसा झाला याचा अतिशय रंजक आणि वेगवान पण
सखोल परिचय करून देण्यात आलेला आहे.
मालिकेच्या दुसऱ्या पुस्तकात एआयचे कामकाज नेमके कसे चालते याचे सखोल
विवेचन केलेले आहे. एआयच्या मागची जादू या पुस्तकातून उलगडते.
मालिकेच्या तिसऱ्या पुस्तकात एआयच्या यशामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका
बजावणारे एआयचे जनक ॲलन ट्युरिंग आणि नोबेल पारितोषिक विजेते जेफ्री
हिंटन यांच्या आयुष्याचा आणि कामाचा प्रवास रेखाटलेला आहे.
या पुस्तक मालिकेने एआय या अतिशय महत्त्वाच्या विषयासंबंधीची सखोल
आणि रसाळ माहिती वाचकांसमोर आणलेली आहे.
Share
