Adhunik Krushi Awajare Wa Yantre By Dr. Tulshidas Bastewad (आधुनिक कृषी अवजारे व यंत्रे )
Adhunik Krushi Awajare Wa Yantre By Dr. Tulshidas Bastewad (आधुनिक कृषी अवजारे व यंत्रे )
जमीन मशागत, पेरणी, पुनर्लागवड आणि पीक काढणीसाठी विविध प्रकारची अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्यांच्या रोजच्या वापरात असतात. सध्या शेतीत जाणवणाऱ्या मजुरांच्या कमतरतेमुळे ही अवजारे वापरली जातात. त्यामुळेच शेतीमधले यांत्रिकीकरण महत्त्वाचे ठरत आहे. तरीही, शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यात अनेक आव्हाने आहेत. अवजारांबद्दलचे अज्ञान हे त्यातले प्रमुख आव्हान आहे.
ऊस, कपाशी, सोयाबीन, फळबागा यांसाठी उपयुक्त ठरणारी अवजारे आणि यंत्रे तसेच महिलांचे श्रम कमी करणारी अवजारे अशा विविध प्रकारच्या अवजारांविषयीची माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल.
विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना आता एकाच ठिकाणी विविध कृषी अवजारे, यंत्रे, याविषयीची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. अवजारांची देखभाल आणि ट्रॅक्टरची कार्यक्षमता याविषयीची माहितीही या पुस्तकात सविस्तर वाचायला मिळेल. त्यादृष्टीने सर्वसामान्य शेतकरी ते प्रगतिशील शेतकऱ्यांपर्यंत सर्वांसाठीच हे पुस्तक महत्त्वाचे ठरते. अवजारांविषयीचे अज्ञान दूर व्हावे म्हणूनच डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांचे आधुनिक कृषी अवजारे व यंत्रे हे पुस्तक महत्त्वाचे ठरते.