Adhapaat By Govind Narayan Datarshastri
Adhapaat By Govind Narayan Datarshastri
Couldn't load pickup availability
कादंबरीतील उल्लेख पाहून ही कादंबरी हजारोवर्षापूर्वी मध्यप्रदेशात घडली असावी कारण यात विध्य पर्वत व अवंतिनगरी यांचेउल्लेख आहेत. कादंबरीची सुरूवातच कारागृहाच्या वर्णनानेहोते. कादंबरीत कुसुमपुर या शहराचेवर्णन आहे. कादंबरीत कालजित हा खलनायक सर्वत्र दिसतो. उपोद्घातापासूनच त्याची कृष्णकृत्ये चालू झालेली दिसतात. लेखकाने भगवत्गीतेच्या १६ व्या अध्यायातील दैवीसंपत्ती आणि आसुरी संपत्ती या कल्पनेचा वापर जागोजागी केलेला आहे. कालजित हा या कादंबरीचा खलनायक असून मरुभूती, सिंहरव, सरस्वती, कुमुदिनी, रूपलता, ही सर्व पात्रे दैवी संपत्तीने युक्त आहेत. दातारांच्या सर्वच कादंबऱ्याप्रमाणे याही कादंबरीत द्वंद्वयुद्धेआहेत. चेमप्रकरणे आहेत, रहस्यमय दुर्ग आहेत व वेषांतरेही आहेत. कादंबरी वाचायला लागल्यानंतर तुम्ही कदंबरीतील कथानकाशी समरस होता व त्यातीलच एक भाग बनता. दुष्टांचा अधःपात होणार हेतत्व येथेगृहीत धरलेलेच आहे. जुन्या पद्धतीनुसार या कादंबरीला उपोद्घात व उपसंहार असून उपसंहार हिमालयासारखे जेथे ज्वालामुखीचे स्थान आहेत्याच्या आसपास घडतो. ब्रम्हराक्षस शेवटी कालजिताच्या अधःपाताबद्दल त्याला अग्निकुंडात फेकून शिक्षा करतोव कादंबरी संपते.
Share
