Aashad Baar By Makrand Sathe (आषाढ बार)
Aashad Baar By Makrand Sathe (आषाढ बार)
Couldn't load pickup availability
नाटककारांच्या प्रेमात असलेल्या नटीला सूत्रधार म्हणतो, ‘आधीच पाऊस, आषाढ, त्यात बार, त्यात नाटककार तेही एक नव्हे, दोन नव्हे तर चार; त्यातही विषय प्रेम, प्रेमभंग, शृंगारिक संबंध असले हे म्हणजे म्हणतात ना – आधीच मर्कट तशातही मद्य प्याला, झाला तशात वृश्चिकदंश त्याला, झाली तशात तदनंतर भूतबाधा, चेष्टा किती वटू मग कपिच्या अगाधा….’
… आणि हे लेखक आहेत चार निरनिराळ्या काळातले… कविकुलगुरू कालिदास, शूद्रक, मोहन राकेश आणि आजच्या पिढीचा एक महत्त्वाचा लेखक-दिग्दर्शक सिध्दार्थ !.
… आणि मग या ‘आषाढ बार’मधे चालू होतो एक विचार-भावनांचा कल्लोळ -मोहन राकेशने ‘आषाढ का एक दिन’ या नाटकामधे घेतलेल्या कालिदासाच्या जगण्याच्या, नाटकांच्या, राजकारणाच्या, प्रेमाच्या आणि विषादांच्या धांडोळ्याच्या खेळाचाच वेध घेत, हे नाटक पुढे सरकतं एखाद्या नाटकाच्या धबधब्यासारखं – कॅस्केडसारखं… आणि येतं आजच्या काळापर्यंत !
आणि ऐरणीवर येतात अनेक मुद्दे… व्यक्तिगत, सामाजिक आणि राजकीय; भावनिक आणि सैद्धान्तिक… तेही या चार सिद्धहस्त लेखकांच्या लालित्यपूर्ण शैलीतून आणि खोलवर वेध घेणाऱ्या नजरेतून… आणि उभा राहतो भारतातील गेल्या अनेक शतकातील रंगभूमीचा एक पट, त्याचं या सभ्यतेशी असणारं गहिरं नातं.
Share
