Aaple San Utsav Aani Tyatil Vidnyan By Dr Varsha Joshi
Aaple San Utsav Aani Tyatil Vidnyan By Dr Varsha Joshi
आपण मराठी माणसं वर्षभरात अनेक छोटे-मोठे सण-उत्सव साजरे करत असतो, त्यांचा आनंद घेत असतो. आनंद मिळवण्याबरोबरच त्यातून आपण आपली संस्कृतीही जपत असतो. हे सण-उत्सव, दिनविशेष साजरे चालत आलं आहे. परंतु जनमानसात पूर्वजांचे काही निश्चित उद्देश होते, प्रयोक सणांचे दिवस साजरे करण्याच्या काही पद्धती त्यांनी आखून दिल्या आहेत तसेच आहार-विहाराविषयी काही दंडकही घालून दिले आहेत. लेखिका डॉ. वर्षा जोशी या विज्ञानाच्या अभ्यासक. आम्ही त्यांची आजवर दैनंदिन विज्ञानाची पुष्कळ पुस्तकं प्रकाशित केली आहेत. सदर पुस्तकात त्यांनी आपले सण-उत्सव कसे साजरे करावेत याविषयी शास्त्रशुद्ध माहिती-ज्ञान देऊन सण-उत्सवांचं प्रयोजन आणि परंपरेने चालत आलेली नियमनं यांची कारणमीमांसा केली आहे, त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला आहे. निसर्ग आणि सण-उत्सव यांचं नातं सांगितलं आहे. आपल्याला मार्गदर्शन करून, ज्ञानसंपन्न करून आपल्या आनंदात भर टाकणारं पुस्तक... आपले सण, उत्सव आणि त्यातील विज्ञान