Aaple Dhey Kase Gathal ? By Jonh AKF (आपले ध्येय कसे गाठाल?)
Aaple Dhey Kase Gathal ? By Jonh AKF (आपले ध्येय कसे गाठाल?)
Couldn't load pickup availability
लेखक जॉन एकफ यांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेचा उपयोग करण्याबाबत उत्सुकता निर्माण झाली, त्या वेळी त्यांनी डॉ. माइक पिस्ली यांच्यासोबत एक संशोधनपर अभ्यास सुरू केला. त्यांनी 3,000हून अधिक लोकांना, ते त्यांच्या पूर्ण क्षमतेनुसार जीवन जगत आहेत का, असा प्रश्न केला. पन्नास टक्के लोकांनी असे नोंदवले की, त्यांच्या संपूर्ण क्षमतेचा पन्नास टक्के वापर अजूनही झालेला नाही. याचा अर्थ असा की, आपल्यापैकी निम्मे लोक आपले निम्मे आयुष्य जगत आहेत. कल्पना करा की, तुमच्याकडे समाधानकारक आणि यशस्वी करिअर असेल तर? तुम्हाला सुदृढ वैवाहिक जीवनाचा आणि घट्ट मैत्रीचा आनंद घेता आला तर? तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वोत्तम शारीरिक स्थितीत असाल तर? तुमच्यासाठी प्रत्येक दिवस एखाद्या भेटवस्तूसारखा वाटला आणि प्रत्येक वर्ष मागील वर्षापेक्षा अधिक चांगले झाले तर? तुम्ही तुमच्या भूतकाळातून शिकू शकलात, तुमच्या वर्तमानाचा आनंद घेऊ शकलात आणि तुमच्या भविष्यासाठी तयारी करू शकलात तर? हे किती अद्भुत असेल!...आणि विचार करा, हे सर्व साध्य करण्यासाठी तुम्हाला मात्र एक ध्येय निश्चित करायचे आहे, तर...
Share
