Aapan Jasa Vichar Karato By James Allen (आपण जसा विचार करतो, तसेच आपण असतो)
Aapan Jasa Vichar Karato By James Allen (आपण जसा विचार करतो, तसेच आपण असतो)
Couldn't load pickup availability
आपण जसा विचार करतो, तसेच आपण असतो', ह्या मूलगामी आणि सर्वव्यापी सूत्राने माणसाच्या संपूर्ण अस्तित्त्वाला व्यापून टाकलेले आहे. माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक स्थिती-गती वा प्रसंग यांना विचार सहज स्पर्श करु शकतात! याचाच अर्थ, माणूस म्हणजे अक्षरशः त्याचे विचारच असतात. यातही माणसाचे व्यक्तित्त्व हे त्याच्या विचारांची एकप्रकारे गोळाबेरीजच असते, असे म्हटले, तर ते अतिशयोक्त ठरु नये!
एखाद्या बीजामधून रोप झेपावते, पण बीजच नसेल, तर रोपाचे अस्तित्त्व असू शकेल काय? अगदी त्याचप्रमाणे माणसाची प्रत्येक कृती ही त्याच्या विचारातूनच आकाराला येत असते. मुख्य म्हणजे त्या विचाराशिवाय कृती ही संभवतच नाही. तुमची कृती ही उत्स्फुर्त असो वा पूर्वनियोजित किंवा जाणिवपूर्वक व पूर्ण विचारान्ती अवतरलेली असो, त्याचा या ना त्या प्रकारे विचारांशी प्रत्यक्षाप्रत्यक्ष संबंध असतोच! आपल्या मनातल्या विचारांनी आपल्याला घडवलेले आहे, आपण जे काही असतो, ते आपल्या विचारांनी ठाकूनठोकून घडवले गेलेले असतो. आपल्या मनात अनीतीचे आणि दुष्ट विचार असतील, तर आपल्याला दुःख हे भोगावे लागणारच! गाडीच्या चाकामागून जसा बैल येतो, तसेच हे आहे. जर एखाद्याने विचारात पावित्र्य आणि शुद्धता जोपासली असेल, तर पाठोपाठ सुख आणि समाधान, हे देहामागून सावली यावी, तसे त्याच्यामागून येणार, यात शंका नाही.
Share
