Aamcha Patrakari Khatatop By Suhas Kulkarni (आमचा पत्रकारी खटाटोप)
Aamcha Patrakari Khatatop By Suhas Kulkarni (आमचा पत्रकारी खटाटोप)
Couldn't load pickup availability
‘युनिक फीचर्स’ हे नाव वाचत्या महाराष्ट्राला परिचित आहे.
एकाच वेळेस वीस-पंचवीस छोट्या-मोठ्या दैनिकांसोबत काम करणारी फीचर्स सर्व्हिस ही या संस्थेची पहिली ओळख. महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांप्रमाणेच दुर्लक्षित आणि दृष्टिआड झालेल्या विषयांवर केलेलं चौफेर लेखन हे या संस्थेचं वैशिष्ट्य.
‘युनिक फीचर्स’ने दैनिकं, साप्ताहिकं, आणि टीव्ही चॅनल्ससारख्या विविध मेनस्ट्रीम माध्यमांतून समाजभान जागं ठेवण्याचं काम केलंच, शिवाय जागत्या वाचकांसाठी हक्काची व्यासपीठंही उभी केली. स्वतःचं मासिक सुरू केलं. स्वतःचे दिवाळी अंक सुरू केले. स्वतःची प्रकाशन संस्था काढून पुस्तकांमधूनही सामाजिक पत्रकारिता करता येऊ शकते हे दाखवून दिलं.
पत्रकारितेत स्वतःची वाट चोखाळणार्या तरुणांच्या एकत्रित धडपडीतून उभ्या राहिलेल्या एका यशस्वी प्रयोगाची ही गोष्ट. पंचवीस वर्षांच्या पहिल्या टप्प्यातला खटाटोप उलगडून दाखवणारी.
Share
