Aajachi Aswasth Kutumbe By Pushpa Solanke (आजची अस्वस्थ कुटुंबे)
Aajachi Aswasth Kutumbe By Pushpa Solanke (आजची अस्वस्थ कुटुंबे)
Couldn't load pickup availability
प्रत्येकाला आपलं घर प्रफुल्लित आणि हसरं असावं, निशिगंधाच्या सुगंधासारखं प्रेम तिथं मिळावं असं वाटत असतं. खूप पूर्वीपासून मानवप्राण्याला ही स्वप्न खुणवीत होतीच; पण आज आयुष्याची हीं सर्वच्या सर्व सुखस्वप्ने पैसे कमवले की पूर्ण होतील म्हणून मनुष्य वेड्यासारखा पैशामागे इतका धावतोय की त्याची स्वत:शीच फारकत होऊन बसलीय ! आजचं जगच चांगलं नाही, या मानसिकतेतून आई-वडिलांकडून मुलांना माणुसकीचे धडे दिले जात नाहीत! ताणाने ग्रासलेल्या व्यक्ती व्यसनाची मदत घेत आहेत. कष्टाने उभे केलेले मुलांचे संसार अर्ध्यावरच विस्कटत आहेत व पालक आपल्या नशिबाचे फासे उलटे फिरले या भावनेने दु:खी आहेत. तरुणांचे आनंदाचे वय, भांडणात जात आहे. चुकीची जीवनपद्धती आरोग्य बिघडवत आहे. या अस्वस्थेची कारणमीमांसा केली तर उत्तरे मिळणार आहेत आणि त्या उत्तरावर उपायही सापडणार आहेत. सुखी संसार एक कला आहे. त्यासाठी काही सोपे मंत्र आहेत. जीवनादर्शाला जीवनात प्रतिष्ठित बनवले, प्रेमतत्त्व, नीतितत्त्व व अध्यात्म यांचा हात धरून जीवनात चालले तर 'सुख' म्हणजेच ‘मन:शांती’ घरात नक्कीच नांदते ! घराच्या आनंदासाठी स्वत:लाही व घरातील माणसांना जपायचे कसे? या विषयाचे तंत्र, मंत्र आणि समुपदेशन या पुस्तकातून वाचकांना मिळेल ही अपेक्षा.