Aaibaichya Navan By Krushnat Khot (आईबाईच्या नावानं)
Aaibaichya Navan By Krushnat Khot (आईबाईच्या नावानं)
Couldn't load pickup availability
मराठी कथात्मक साहित्यात स्वतंत्र ओळख असणारे कृष्णात खोत हे महत्वाचे कादंबरीकार आहेत. आईबाईच्या नावान... हा त्यांना कथासंग्रह म्हणजे बाईतील माणसाचा शोध होय. या संग्रहातील प्रत्येक कथा कसलाही बाईपणाचा गाजावाजा करत नाही. रुढ परिघाच्या पलीकडे जात तिच्या अस्तित्वाबद्दल काही नवे प्रश्न उपस्थित करते माणून म्हणून लढाई लढताना पारंपरिक पुरुषी व्यवस्थेला छेद देण्याचं तिचं धैर्य, त्यामागील तिच्या शहाणपणाचं कृष्णात खोत एका नव्या दृष्टिकोनातून आकलन करू पाहतात. सामाजिक न्याय, मानवी हक्क, भेदभाव, शोषण या बद्दलचे कसलंच पुस्तकी ज्ञान नसणाऱ्या गावखेड्यातील या स्त्रिया आत्मसन्मानासाठी आपआपल्या ताकदीनुसार लढत राहतात. झगडत राहतात आपली लढाई लढत राहतात. आपल्या स्वातंत्र्यावर आणि सत्त्वावर येणाऱ्या कोणत्याही सावलीचा अडथळा दूर करत, त्या आपले स्वातंत्र्य अबाधित राखत वाढू पाहतात.
Share
