Aadhunik Bharatatil Aadya Krushitadnya Jotirao Govindrao Phule By Dr. R. D. Shinde (आधुनिक भारतातील आद्य कृषीतज्ञ जोतिराव गोविंदराव फुले)
Aadhunik Bharatatil Aadya Krushitadnya Jotirao Govindrao Phule By Dr. R. D. Shinde (आधुनिक भारतातील आद्य कृषीतज्ञ जोतिराव गोविंदराव फुले)
Couldn't load pickup availability
सन १८८३ साली महात्मा जोतीराव फुले यांनी लिहिलेला 'शेतकऱ्याचा असूड' हा ग्रंथ म्हणजे त्यांच्या भौतिकवादी द्वंद्वात्मक अशा ऐतिहासिक दृष्टिकोनाचा आणि ज्ञानाच्या भौतिक ताकदीचे महत्त्व मांडणारा पायाभूत ग्रंथ आहे. साम्राज्यवादाचे शोषक स्वरूप, शेतकरी आणि श्रमिक जातींच्या पिळवणूकीचा आशय आणि स्वरूप, पर्यावरणाचे संतुलन आणि ते समृद्ध करण्यासाठी करावी लागणारी उपाययोजना, शेती आणि पाणी संबंध आणि समन्यायी पाणी वाटपाचा पर्याय या सर्व अंगांनी केलेले विश्लेषण या ग्रंथात आहे. जगात पहिल्यांदाच असा ग्रंथ लिहिला गेला आहे. शेतीची समृद्धी आणि नव्या पद्धतीच्या पर्यावरणपूरक शेती उद्योगांचे पर्याय जोतीरावांनी पुढे आणले आणि आजही उपयुक्त होईल असा दृष्टिकोन मांडला. आज असे पर्याय अमलात आणण्याची गरज आहे. डॉ. आर. डी. शिंदे यांनी 'आधुनिक भारतातील आद्य कृषीतज्ज्ञ जोतीराव गोविंदराव फुले' या छोटेखानी ग्रंथात या संदर्भात सघन मांडणी केली आहे. त्यामुळे या ग्रंथाची दखल ग्रामीण श्रमिक जाती आणि वर्गांबरोबरच धोरणात्मक पातळीवर सुद्धा घेतली जाईल यात शंका नाही.