5 AM Club ( Marathi ) By Robin Sharma ( ५ ए.एम. क्लब )
5 AM Club ( Marathi ) By Robin Sharma ( ५ ए.एम. क्लब )
Couldn't load pickup availability
आयुष्यात काही वेळा कंटाळा येतो, नैराश्य येते, एकाकी वाटू लागते. पूर्वीसारखी परिस्थिती राहत नाही आणि नव्या व्यवस्थेत जुळवून घेता येत नाही, अशी अवस्था होते. पण अपयशातूनही खूप काही शिकण्यासारखे असते. कठोर परिश्रम, जिद्द, झपाटलेपणा, सततचे प्रयत्न तसेच आत्मशोधामुळे व्यक्ती वेगाने प्रगती करत असते, असा विश्वास देत रॉबिन शर्मा यांनी ‘५ ए.म. क्लब’मधून पहाटेची जीवनरीत आणि शैली यांचे महत्त्व सांगितले आहे.
एक चित्रकार व एक महिला उद्योजिका यांना काळजीमुक्त, तणावमुक्त करीत खुले जीवन जगण्याचा सल्ला प्रथितयश उद्योजक मि. रिले देतात. तसेच ‘५ ए.म. क्लब’चे महत्त्व एका व्याख्यात्याच्या ओघवत्या भाषणाच्या आधाराने यात पटवून दिले आहे. पहाटेच्या जीवनशैलीमुळे होणारा विकास, प्रगती यांची दिशा दाखवली आहे. पहाटेच्या निरव शांततेत शिकण्याच्या अवस्था असते. पहाटे आपले मन गतिमान असते. पहाटे उठण्याची कला आत्मसात केली की जीवन समृद्ध होते, हा संदेश देताना अनेक उदाहरणेही दिली आहेत.
Share
