3 Book set ( 13 Goshti Jya khabhir Palak Karat nahit + Mi Nujood + Ready For Anything) - New Arrival
3 Book set ( 13 Goshti Jya khabhir Palak Karat nahit + Mi Nujood + Ready For Anything) - New Arrival
Couldn't load pickup availability
1) Mi Nujud - Nujood Ali (Author), Delphine Minoui
______________________________________________________________________
2) 13 Goshti Jya khabhir Palak Karat nahit (१३ गोष्टी ज्या खंबीर लोक करत नाहीत)| Author - Amy Morin -
"१३ गोष्टी ज्या खंबीर लोक करत नाहीत" या पुस्तकाच्या लेखिका अॅमी मॉरिन आता १३ गोष्टी ज्या खंबीर पालक करत नाहीत" या पुस्तकाद्वारे मुलांना वाढवताना त्यांना मानसिकदृष्टया मजबूत आणि लवचीक कसं बनवायचं हे सांगतात. लेखिका अॅमी मॉरिन या फॉस्टर पालक, मानसोपचारतज्ज्ञ आणि कुटुंब व किशोरवयीन थेरपीमधील तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं अनुभवाचं सार या पुस्तकात उतरलं आहे.
सर्व जण पालकांना "काय करावे" हे सांगत असताना हे पुस्तक पालकांना "काय करू नये" हे सांगतं, जे मुलांना मानसिकदृष्टया मजबूत करण्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर या पुस्तकात केस स्टडीज, व्यावहारिक टिप्स, विशिष्ट धोरणे आणि सिद्ध पद्धतींचा समावेश आहे, ज्यामुळे सर्व वयोगटातील मुलांना बालवाडीपासून किशोरवयीन मुलांपर्यंत मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्यासाठी मदत होते.
पालकत्व आणि अपराधीपणाची भावना
वर्चस्व - तुमचं मुलांवर की मुलांचं तुमच्यावर ?
मुलांना जबाबदार कसं बनवावं?
पालक आणि परिपूर्णतेची अपेक्षा.
मुलं आणि चुका...
शिस्त आणि शिक्षा यातील गल्लत
_______________________________________________________________________________
3) Ready For Anything-
डेव्हिड अॅलनची शक्तिशाली उत्पादक तत्त्वे जाणून घ्या आणि ढोरमेहनत करण्याऐवजी हुशारीने काम करण्याची तुमची क्षमता वाढवा.
फास्ट कंपनी ज्यांना "वैयक्तिक उत्पादकतेचे गुरू" म्हणते असे अॅलन विचारतात, अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला मागे खेचते ? आणि दाखवून देते की, आपलं मन, टेबल आणि हेतू स्वच्छ आणि स्पष्ट असेल तर आपण कुठल्याही गोष्टीसाठी तयार (रेडो फॉर एनिथिंग) असू शकतो.
हे पुस्तक तुम्हाला पुढील मार्ग विस्ताराने सुचवते
सर्जनशीलतेसाठी तुमचं मन रिकामं (स्वच्छ) करा
तुमचं ध्यान केंद्रित करा
असा आराखडा तयार करा, जो काम करेल
गोष्टी पूर्णत्वाकडे नेण्यासाठी पावलं उचला
तुमच्या वेळेचे नाही तर तुमच्या मनाचे व्यवस्थापन करा, असं अॅलन म्हणतात. या पुस्तकात दिलेल्या छोट्या पण प्रेरणादायी धड्यांमधून आपण हे शिकतो की, दररोजच्या जीवनात वेगवेगळ्या निवडी करताना, निर्णय घेताना आणि वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड देताना एखाद्या मार्शल आर्ट तज्ज्ञासारखं शांत आणि एकाग्र कसं राहावं, या पुस्तकातील प्रत्येक तत्त्व आपल्याला नवीन पद्धतीने विचार करायला भाग पाडतं. त्याचबरोबर कमी प्रयत्नात, फारसा ताण न घेता आणि जास्त ऊर्जेने काम कशी पूर्ण करायची हे दाखवतं.
Share
