21 Shauryakatha By Pushpa Thakkar
21 Shauryakatha By Pushpa Thakkar
Couldn't load pickup availability
लहान मुलांचे स्वतःचे असे एक कल्पनाविश्व असते. गोष्टी म्हणजे मुलांसाठी अद्भुतरम्य कल्पनांची मालिकाच जणू ! त्यांच्या स्वप्नवत कल्पना त्यांना गोष्टींतून जागोजागी दिसतात. एखादी सवय, सल्ला, मार्गदर्शन उपदेश करून सांगण्यापेक्षा गोष्टीरूप सांगितला तर ते चटकन आत्मसात करतात. म्हणूनच मुलांच्या संस्कारक्षम वयात योग्य त्या गोष्टींची शिदोरी त्यांना मिळणे फार आवश्यक असते. मुलांना चांगले-वाईट, योग्य-अयोग्यतेचे धडे गोष्टींतून मिळत असतात. गोष्टींमध्ये राक्षस, चेटकीण, जादूगार, प्राणी आणि प्रेमळ राजा-राणीसुद्धा असतात. गोष्टींमधील काही पात्रं सगळ्यांच्या भल्याचा विचार करतात; तर दुष्ट प्रवृत्तीची पात्रं विनाशक विचार आणि कृती करत असतात. मुलं त्या गोष्टी प्रत्यक्ष जगतात.
या गोष्टींतील पराक्रमांपासून मुलांना प्रेरणा मिळेल. तसेच त्यांच्यावर मनोरंजनातून चांगुलपणाचे, व्यवहार्य ज्ञानवाढीचे संस्कार होतील.
लीला शिंदे
Share
