डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2024-25 ( इयत्ता सहावी )
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2024-25 ( इयत्ता सहावी )
बायोमटेरिअल :
रुग्णचिकित्सेतील नवा अध्याय
रोगनिदान, उपचार व शस्त्रक्रियांकरिता 1 अत्याधुनिक उपकरणांच्या निर्मितीसाठी नावाजले गेलेले जैववैद्यकीय क्षेत्र आता अभिनव जैवसाहित्याच्या प्रत्यक्ष उपयोगासाठी वाखाणले जाऊ लागले आहे. डोक्यातील विचार कम्प्युटरवर उतरविणाऱ्या ब्रेन-कम्प्युटर इंटरफेससाठीचे बायोइलेक्ट्रॉनिक साहित्य असो, वा पार्किन्सन्ससह मेंदूशी संबंधित इतर आजारांवर उपकारक ठरणारे इन्जेक्टेबल हायड्रोजेल इम्प्लान्ट्स, जैववैद्यकीय क्षेत्राने बायोमटेरिअल्सच्या संशोधनात मोठी मजल मारली आहे. मानवी मेंदूत बसेल अशी सूक्ष्म चिप आणि मेंदूतील पेशींची हानी भरून काढेल असे तापमानानुसार भौतिक गुणधर्म बदलणारे हायड्रोजेल निर्माण करण्याचे काम जैववैद्यकीय क्षेत्राने केले आहे. खेकड्याच्या कवचातील विशिष्ट प्रकारची साखर (कायटोसन) वापरून है हायड्रोजेल तयार केले जाते. अवयवारोपण, औषधचाचणी आणि रोगाविषयीच्या संशोधनातील पुढचे पाऊल ठरलेल्या थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञानासाठी विशिष्ट अशा बायोइंकचीही निर्मिती या क्षेत्राने केली आहे.