डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2024-25 ( इयत्ता नववी )
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2024-25 ( इयत्ता नववी )
Couldn't load pickup availability
CAR T-सेल थेरपी : कर्करोग उपचारांतील क्रांती
लिम्फोमा आणि ल्युकेमियासारख्या रक्ताच्या 1 कर्करोगांवर कायमेरिक औटेजेन रिसेप्टर म्हणजेच CAR T-सेल थेरपी ही सर्वात आधुनिक आणि प्रभावी उपचारपद्धती म्हणून उदयास येत आहे, कर्करोगावरील पारंपरिक उपचारपद्धतींच्या तुलनेत CAR T-सेल थेरपी पूर्णपणे वेगळी ठरते. रोगप्रतिकारक यंत्रणेतील एक प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशी (T-सेल) काढून कर्करोगाच्या तीव्रतेनुसार त्यात फेरफार केले जातात व त्या पुन्हा रुग्णाच्या शरीरात सोडल्या जातात. या T-सेल स्क्तातील कर्करोगाच्या पेशी ओळखून नष्ट करण्याचे काम करतात. मज्जासंस्थेशी संबंधित किरकोळ दुष्परिणामांची शक्यता बगळल्यास ही उपचारपद्धती पूर्णपणे सुरक्षित असून, कर्करोग उपचारांत क्रांती घडवून आणेल, अशी खात्री वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना आहे. जगभरात मान्यता मिळू लागली असल्याने आता याच पद्धतीने कर्करोगाचे ट्यूमर्सही नष्ट करण्याविषयीचे संशोधन सुरू आहे.
Share
