Jivan Utkarsha - 17 Pustkancha Sanch Special Offer 50% (जीवन उत्कर्ष – १७ पुस्तकांचा महासंच)
Jivan Utkarsha - 17 Pustkancha Sanch Special Offer 50% (जीवन उत्कर्ष – १७ पुस्तकांचा महासंच)
Couldn't load pickup availability
१) शिवरायांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे – नवनाथ जगताप | किंमत २५०/-
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका युगाचे नायक नव्हते; तर ते तेज, शौर्य आणि नीतीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शून्यातून स्वराज्य उभारणाऱ्या या युगपुरुषाचे व्यवस्थापन कौशल्य आणि दूरदृष्टी आजही कालातित आहे.
'शिवरायांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक महाराजांच्या तेजस्वी चरित्रातून वेचलेले ५१ अमूल्य मंत्र आहेत. या सूत्रांमध्ये प्रभावी नेतृत्व, अचूक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि निस्सीम राष्ट्रप्रेमाची गुरुकिल्ली दडलेली आहे.
२) श्रीकृष्णनीती: प्रेरणांचा अखंड स्रोत - काल, आज आणि उद्या - नवनाथ जगताप | किंमत १९९/-
कुरुक्षेत्रातील रणभूमीवर गूढ हास्य करणारा, गोकुळातील गोपालकृष्ण, आणि धर्मसंघर्षात न थकणारा नीति-सामर्थ्याचा आधार — श्रीकृष्ण!
त्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात लपलेली अमर नीती आजही मानवजातीला प्रेरणा देते.
श्रीकृष्णनीती हे पुस्तक केवळ गीतेपुरते मर्यादित न राहता, बाललीला, कंसवध, गिरीधर रूप, रुक्मिणीहरण, महाभारतातील रणनीती, शांतिदूताची भूमिका, सुदामा भेट, आणि धर्मसंस्थापनेच्या अद्भुत कार्यापर्यंतचा विस्तृत जीवनप्रवास उलगडते.
३) गनिमी कावा :अजिंक्य युद्धनितीचा गुढ मंत्र - नवनाथ जगताप | किंमत १९९/-
शिवाजी महाराज आणि त्यांचे सेनापती गनिमी कावा युद्ध तंत्रात इतके माहीर आणि वाकबगार होते की स्वराज्याचे कट्टर शत्रू असलेल्या मोगली सैन्याला ते हातोहात मूर्ख बनवत.
डॉ. बाळकृष्ण
थोर इतिहासकार, तथा कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू
४) आर्य चाणक्य अर्थात चाणक्याची संपूर्ण गोष्ट - वामन शास्त्री | किंमत २९९/-
नंद राजाच्या कृत्याने अपमानित होऊन शेंडीची गाठ सोडून, ‘नंद कुळाचा नाश केल्याशिवाय मी शेंडीला गाठ मारणार नाही,’ अशी घोर प्रतिज्ञा करणारा चाणक्य नेमका कुठला, नंद राजाच्या देशात तो कसा आला? चंद्रगुप्त कोण? त्याची चाणक्यशी भेट झाली कशी झाली आणि या प्रतिज्ञेप्रत येण्यास ठोस कारण काय घडले, हा इतिहास फार प्रकाशित नाही. वामनशास्त्री पंडित यांनी संस्कृत ग्रंथावरून लिहिलेले हे पुस्तक चाणक्यच्या पूर्वायुष्याबद्दल खूप सखोल माहिती देतं. आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने लिहिलेल्या सूत्रांनुसार व्यवहार होतही असतील, पण पूर्वार्ध ज्ञात होणे म्हणजेच पूर्ण चाणक्य समजणे होय.
५) झाशीची राणी – विजय सातपुते | किंमत ४०/-
झाशीची राणी हे विजय सातपुते यांनी लिहिलेले एक प्रेरणादायी ऐतिहासिक चरित्र आहे, ज्यामध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यपूर्ण जीवनाची कथा प्रभावीपणे मांडली आहे.या पुस्तकात राणी लक्ष्मीबाईंचे बालपण, त्यांचे धाडसी स्वभाव, युद्धकौशल्य आणि झाशीच्या संरक्षणासाठी त्यांनी दिलेला लढा याचे सजीव वर्णन केले आहे. इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दाखवलेले पराक्रम, त्यांची नेतृत्वक्षमता आणि मातृभूमीवरील प्रेम वाचकांच्या मनात अभिमान निर्माण करते.
६) भारतमातेच्या कर्तृत्ववान कन्या – विठ्ठलराय भट | किंमत ५०/-
भारतीय समाजात गेल्या अनेक शतकांपासून, विशेषतः 'मनुस्मृती' काळापासून स्त्रियांचे सामाजिक स्थान झपाट्याने खालावत चालले आहे. स्त्रीला अतिशुद्रांच्या पंक्तीला बसवून तिला शिक्षण व स्वातंत्र्यापासून वंचित करण्यात आले. वेदकाळात मात्र तशी परिस्थिती नव्हती. त्यावेळी स्त्रीयांचे मुंज (उपनयन संस्कार) होत असे. वेदांतील अनेकानेक ऋचा-गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, इला, शचि, सविता, सरस्वती - इत्यादी स्त्रियांनी रचिल्या होत्या. याचे स्पष्ट उल्लेख सापडतात. भास्कराचार्यांची मुलगी-लीलावती तर गणितज्ज्ञ, ज्योतिषी व सकल शास्त्रांत पारंगत होती. तिला आचार्य ही पदवी प्राप्त होती व ती गुरूकुल चालवत असे.
७) महामानव स्वामी विवेका नंद- विजय सातपुते | किंमत १००/-
लेखकाचे मनोगत जगातील नररत्नांच्या खाणीतील काही नररत्न, मान्यवर, महात्मे, महामानव यांचे चरित्र कार्यकर्तुत्व, नेतृत्व, वक्तृत्व अलौकिक समाज कार्य हे अनाकलनीय आहे. हे त्रिकालबाधीत सत्य आहे. आपल्या या विश्वात्म्याचे स्मरण म्हणजे कार्यकर्तृत्वाच्या प्रेरणेचा अखंड स्त्रोत असतो. त्यांच्या चरित्रातून मानव जातीला नेहमीच प्रेरणा, बोध आणि मार्गदर्शन मिळत असते. केवळ भारतीयांनाच नव्हे तर जगातील साऱ्या मानवांना त्याचा लाभ होत असतो. आपल्या जगाच्या पाठीवर, ज्यांनी ज्यांनी विजयध्वज फडकविला त्या महान महामानवाची विश्वात्म्याची जीवन-चरित्रे, कार्यकर्तृत्व, नेतृत्व, संघटन कौशल्य, अमोघ वाणीतील वक्तृत्वाचे पैलू संक्षिप्त सोप्या आणि सहज शैलीत रूचेल, झेपेल अशा पद्धतीने श्रेयस व प्रेयस, स्थल काल, परिस्थिती सापेक्ष पृष्ठ संख्याची मर्यादा विचारात घेऊन मी एका विश्वात्म्याची वक्तृत्वाचा महामेरू, विद्युत प्रभावी वक्ता, महामानव "स्वामी विवेकानंद" यांचे अलौकिक वक्तृत्व कार्यकर्तृत्व धर्मप्रसार, प्रचार वाचंकासमोर ठेवण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे.
८) सुविचार माला- मनीषा बर्वे | किंमत १५/-
सुविचार माला हे मनीषा बारवे यांनी साकारलेले एक प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक पुस्तक आहे. या पुस्तकात जीवनातील विविध पैलूंवर आधारित सुंदर, सकारात्मक आणि मार्गदर्शक सुविचारांचा संग्रह दिला आहे. प्रत्येक सुविचार हा वाचकाच्या मनात नवा दृष्टिकोन निर्माण करतो—यश, परिश्रम, आत्मविश्वास, नाती, वेळेचे महत्त्व आणि जीवनमूल्ये यांसारख्या विषयांवर हे विचार प्रकाश टाकतात. साध्या आणि प्रभावी भाषेत मांडलेले हे सुविचार रोजच्या जीवनात प्रेरणा देतात आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यास मदत करतात.
९) मनाचे व्यवस्थापन - नवनाथ जगताप | किंमत १९९/-
मन हे आपल्या अंतरंगातील एक अदृश्य भाग आहे, ज्यावर आपले सर्व निर्णय, भावना, वेदना, इच्छा, प्रतिज्ञा आणि स्वप्ने अवलंबून असतात. सकारात्मक मन ही खरोखरच देवाने दिलेली देणगी आहे, कारण आपल्या जीवनाचे व्यवस्थापन या मनरूपी अवयवावरच अवलंबून असते. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. वाढत्या स्पर्धेमुळे आपण सतत काहीतरी नवीन शिकण्याचा आणि त्यातून आर्थिक प्रगती करण्याचा मार्ग शोधत असतो. यामुळे लहान मुलांपासून ते निवृत्त व्यक्तींपर्यंत सर्वांचीच मनाची शांतता हरवली आहे. लहान मुलांना बालवाडीपासूनच इतका अभ्यास दिला जातो की ती थकून जातात. आपली मुले सर्वच गोष्टींमध्ये अव्वल असावीत या हट्टामुळे पालकही तणावात राहतात आणि त्यांची मुलेही. तरुण पिढीतील मुलांना तर सतत ताण आणि तणावाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे नैराश्याची (डिप्रेशन) समस्या वाढत चालली आहे.
१०) वेळेचे व्यवस्थापन - नवनाथ जगताप | किंमत २५०/-
या पुस्तकातून तुम्हाला मिळणारे मार्गदर्शन:
• वेळेचे नियोजन कसे करावे आणि प्राधान्यक्रम कसे ठरवावेत
• कार्यक्षमतेने काम करण्यासाठीआवश्यक तंत्र आणि साधने
• विलंब (Procrastination) टाळण्याचे उपाय
• तणावमुक्त काम करण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन
• वैयक्तिक विकासासाठी वेळेचा योग्य वापर
तुमचं आयुष्य अधिक सुयोजित,कार्यक्षम आणि तणावमुक्त बनवण्यासाठी हे पुस्तक वाचा आणि प्रत्येक क्षणाचं सोनं करा!
११) सुविचारतून मन : शांतिकडे-रा. रा. जाभेकर | किंमत २५/-
'सुविचारांतून मनःशांतीकडे' हा विषय दृष्टीपुढे ठेवून श्री. रा. रा. जांभेकर यांनी सुविचार लिहिले आहेत, ते वाचकांची मनःशांती वाढविण्यास उपयुक्त ठरतील असेच निवडले आहेत. कोणतेही सुभाषित रत्नासारखे मौल्यवान असते. संस्कृत साहित्यकारांनी सुभाषिताला रत्नाची उपमा देताना त्याचे मानवी जीवनातील महत्त्वही सांगितले आहे. पृथिव्यां त्रीणी रत्नानि जलम् अन्नम् सुभाषितम्। पृथ्वीवरील तीन रत्ने म्हणजे पाणी, अन्न, आणि सुभाषित होयः अशा शब्दात संस्कृत साहित्यकारांनी हे महत्त्व वर्णिले आहे. अशी चांगली सुभाषिते किंवा सुविचार म्हणजे माणसांच्या पिढ्यान् पिढ्या साचलेल्या अनुभवांच्या खाणीच असतात.
१२) नादब्रम्हांचे मानकरी-विठलराय भट | किंमत ६०/-
नादब्रह्मांचे मानकरी” हे लेखक विठ्ठलराय भट यांचे संगीतविश्वाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. या पुस्तकात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील महान कलाकारांचे जीवन, कार्य आणि योगदान यांचा परिचय करून दिला आहे. या पुस्तकात नादब्रह्म (संगीत हेच ब्रह्म आहे) या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून विविध दिग्गज संगीतकारांची माहिती दिली आहे. गायक, वादक आणि संगीतकार यांचे जीवनचरित्र, त्यांच्या साधनेचा प्रवास, संगीत क्षेत्रातील योगदान, त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण गुण, भारतीय शास्त्रीय संगीताचा सखोल परिचय, महान कलाकारांची प्रेरणादायी जीवनकथा, सोपी आणि रसाळ भाषा, संगीतप्रेमींसाठी उपयुक्त माहिती.
१३) दुरदेशीचे नामवंत - विठ्ठल राय भट | किंमत ३०/-
दुरदेशीचे नामवंत हे पुस्तक वाचकांना जगभरातील महान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देणारे एक महत्त्वपूर्ण चरित्रसंग्रह आहे. या पुस्तकामध्ये लेखक विठ्ठल राय भट यांनी विविध देशांतील नामवंत व्यक्तींचे जीवन, त्यांचा संघर्ष, त्यांनी केलेले कार्य आणि त्यांच्या यशामागील विचार यांचे सोप्या आणि प्रभावी भाषेत चित्रण केले आहे. हे पुस्तक विशेषतः विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तसेच प्रेरणादायी वाचनासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. विविध क्षेत्रांतील (विज्ञान, समाजकार्य, राजकारण, उद्योग इ.) महान व्यक्तींच्या जीवनातून वाचकांना ध्येय, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व समजते. लेखकाने प्रत्येक व्यक्तीची कथा केवळ माहितीपुरती न ठेवता, त्या व्यक्तिमत्त्वामागील प्रेरणादायी पैलू स्पष्ट केले आहेत. त्यामुळे हे पुस्तक वाचकांना केवळ माहिती देत नाही, तर त्यांच्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडवून आणते.
१४) सुविचार आणि थोर व्यक्तींचे विचार दर्शन - श्रीमती प्रमिला मोडक | किंमत २०/-
माणसाचा विचार करण्यात वेळ जातो. त्यातून निश्चित असे काहीच मिळत नसते. परंतु सुविचार मनात आल्याने मनात आनंद निर्माण होतो. निर्भयता प्राप्त होत असते. सुविचारांमध्ये फार मोठी शक्ती असते. काय करावयास हवे? काय नको? हे निश्चित कळत असते. अंधारातून प्रकाशाकडे वाट मिळत असते. मार्ग सापडतो. थोर व्यक्तींचे विचारदर्शन - यामधून निरनिराळ्या संतसञ्जन, थोर, विद्वान, अभ्यासू व्यक्ती, कवी, लेखक यांनी आपल्या अनुभवांतून विचार सांगितलेले असतात. त्यांचे बोलही अत्यंत महत्त्वाचे असतात.
१५) मंत्र सुखाचा – अपूर्वा कर्पे | किंमत १००/-
लेखिकेचे मनोगत .........मी जे काही लेखन करते, ते पूर्णपणे माझ्या मनातले विचार असतात, जे वाचकांच्या हृदयात उतरवण्याचे माझे प्रयत्न आहेत. मला वाटतं, प्रत्येक गोष्ट आठवणीत गेल्यावरच, आपल्या हातातून निसटल्यावरच तिचं महत्त्व कळतं. या पुस्तकांतआठवणींच्या कप्प्यात साठवलेल्या मनात रुतून बसलेल्या गोष्टी आहेत, तर काही न विसरता येणारा, जीवनाच्या वाटेवर चालता चालता आलेला अनुभव आहे. अनुभवाची ही गोधडी तुकड्या-तुकड्यांनी शिवलीय. विविध लोकांच्या भेटीतून आलेल्या क्षणांचा खजिना खुला करून वाचकांच्या समोर ठेवलाय.... यातले काही क्षण, काही अनुभव वाचकांना आपले वाटू शकतात. पण यावरचे, माझे स्वतःचे प्रामाणिक विचार मी मांडले आहेत.
१६) गीतेवरील वेगळा विचार – रा. रा. जांभेकर | किंमत ३००/-
गीतेवरील वेगळा विचार हे रा. रा. जांभेकर यांचे एक सखोल आणि चिंतनशील पुस्तक आहे, ज्यामध्ये भगवद्गीता या महान ग्रंथाचा वेगळ्या दृष्टीकोनातून अभ्यास केला आहे. या पुस्तकात गीतेतील श्लोक, त्यांचे अर्थ आणि त्यामागील तत्त्वज्ञान यांचे आधुनिक जीवनाशी संबंधित स्पष्टीकरण दिले आहे. पारंपरिक अर्थांपलीकडे जाऊन, लेखकाने गीतेतील संदेश आजच्या काळातील समस्यांवर कसा लागू होऊ शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग यांसारख्या संकल्पनांचे सोप्या भाषेत विश्लेषण करताना, जीवनातील ताण-तणाव, निर्णयक्षमता, कर्तव्य आणि आत्मशांती यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ धार्मिक नसून, जीवन व्यवस्थापनासाठीही उपयुक्त ठरते.
१७) प्रभावी वक्ता व्हा!| - नवनाथ जगताप | पाने १९९/-
आत्मविश्वासाने बोला, प्रभावीपणे जिंकून घ्या! 🎤
आजच्या स्पर्धात्मक युगात वक्तृत्व हे केवळ एक कौशल्य नाही, तर यशस्वी जीवनाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. "प्रभावी वक्ता व्हा!" हे पुस्तक तुम्हाला सार्वजनिक बोलण्याचे भय दूर करून आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे संवाद साधण्याची कला शिकवेल. या पुस्तकात तुम्हाला मिळेल:
✅ भाषणाची तयारी आणि प्रभावी मांडणीचे सोपे तंत्र
✅ भाषण म्हणजे नेमके काय ?
✅ भाषणाचा सराव, सुरुवात, आणि प्रभावी शेवट
✅ श्रोत्यांचे लक्ष वेधून घेण्याचे प्रभावी मंत्र
✅ स्टेजवर भाषण करताना भीतीवर मात करून आत्मविश्वासाने कसे बोलावे
✅ शारीरिक भाषा आणि आवाजाचा योग्य वापर
✅ नोकरीच्या मुलाखती, स्पर्धा, व्यावसायिक मीटिंग्जमध्ये यश मिळवण्याचे मार्ग
✅ नेतृत्व कौशल्य आणि प्रभावी संवादाची गुरुकिल्ली
✅भाषण आणि संवाद याविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणारे पुस्तक
Share
