Skip to product information
1 of 2

Yugsanvad By Vishram Gupte (युगसंवाद)

Yugsanvad By Vishram Gupte (युगसंवाद)

Regular price Rs. 595.00
Regular price Rs. 700.00 Sale price Rs. 595.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

भारतामध्ये हिंदूंच्या मानवी अधिकारांची गळचेपी होतेय हे पुराव्यानिशी सिद्ध होत असलं तरी त्याबद्दल बोलणं 'पोलिटिकली करेक्ट' म्हणजे शिष्टसंमत मानलं जात नाही. हिंदूंना फक्त भारतातच नव्हे तर जगभरात बदनाम करणारं एक महाकाय अर्थतंत्र कार्यरत असून त्याचा उद्देश इथल्या हिंदूंना सातत्याने माफीच्या पवित्र्यात उभं करणं हा आहे. आपली सांस्कृतिक ओळख दाखवण्याऐवजी लपवण्यात धन्यता मानणारी हिंदूंची सहिष्णू जमात प्रोग्रेसिव्हिजम, सेक्युलॅरिझम, लिबरॅलिझम आणि वोकीझम सारख्या अधिनायकवादी पाश्चात्य विचारधारांना वचकूनच असते. आज ह्याच चार विचारधारा हिंदूंना त्यांच्याच भूमीत अपराधगंड देण्यामध्ये आघाडीवार दिसून येतात. युगसंवाद मध्ये त्यांचा तार्किक व पुराव्यानिशी प्रतिवाद केलेला आहे. ललित मराठी साहित्याच्या परंपरेत ह्या विचारधारांची अधिसत्ता पूर्वापार परंपरेने चालत आली असली तरी त्यांची जमीन कशी भुसभूशीत आहे हे प्रस्तुत ११ युगसंवाद वाचताना वाचकांना कळेल.
हिंदू विचारविश्वाची अनोखी ओळख म्हणजे इथे हजारो वर्षांपासून रुजलेली वादपरंपरा. तिच्यात पूर्वपक्ष व उत्तरपक्ष असे दोन ध्रुव गृहित धरले असतात मात्र अंतिम सत्य स्थापित करताना ह्या दोन्ही ध्रुवांचा संगम होणं आवश्यक असतं. ग्रीक सभ्यतेत प्लेटोच्या डॉयलॉग्जने ही सत्यशोधनाची प्रथा रुजवली. तर आपल्याकडे ती वेद, उपनिषद् आणि पुराणकथांनी रुजवली. युगसंवाद लिहिताना हीच परंपरा मार्गदर्शन करत होती. सत्य वितंडवादाने नव्हे तर परस्पर संवादाने प्राप्त होतं ही युगसंवादची भूमिका असून परिशिष्टांत समाविष्ठ झालेल्या १३० ग्रंथांची ओळख वाचकांनी आवर्जून वाचावी अशी आहे

View full details