Ya Shodhanshivay Jeevan Ashakya By Prabodh Chaube (या शोधांशिवाय जीवन अशक्य)
Ya Shodhanshivay Jeevan Ashakya By Prabodh Chaube (या शोधांशिवाय जीवन अशक्य)
Couldn't load pickup availability
ज्या असंख्य लोकांच्या कामामुळे आजचे जग भौतिक सुखसोयींनी समृद्ध झाले त्या लोकांची चरित्रं व त्या शोधांचा इतिहास आपल्या बांधवांनी; विशेषत: विद्यार्थ्यांनी जर वाचला तर त्यांना काहीतरी वेगळे करण्याची प्रेरणा मिळेल का? या विचारातून या पुस्तकाची निर्मिती झाली. कोणताही उपदेश न करता आज आपल्या रोजच्या आयुष्यात ज्या वस्तू जीवनातील एक भाग म्हणून सतत वापरतो त्यांच्या शोधांच्या कथा व रंजक इतिहास या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. निव्वळ परदेशी जाण्याचा ध्यास ठेवून आपली बुद्धी आणि शक्ती इतरांच्या कामी खर्च करण्यापेक्षा आपल्याच देशात बदल घडवता आला तर? या पुस्तकातल्या प्रत्येक शोधापासून आपण स्फूर्ती घेतली तर नक्कीच तसे होऊ शकेल! यातला प्रत्येक शोध म्हणजे डझनावारी लोकांचे निदान शतकभराचे तरी प्रयत्न आहेत. हा टप्पा गाठणे म्हणजे काय? तर कल्पकता - कल्पकता आणि कल्पकता!!
Share
