Vivekiyanchi Sangati By Atul Deulagavkar (विवेकीयांची संगती-अतुल देऊळगावकर)
Vivekiyanchi Sangati By Atul Deulagavkar (विवेकीयांची संगती-अतुल देऊळगावकर)
Couldn't load pickup availability
सर्वत्र आत्मप्रेमग्रस्ततेची (selfitis) घातक महासाथ आहे आणि त्यामुळे उथळपणाचा खळखळाटसुद्धा. इन्स्टन्टबाजीच्या काळात सखोल विचार दुर्मीळ झाला आहे. माणसांमधील निखळ संवाद लोप पावतोय. त्याचा विपरीत परिणाम व्यक्ती आणि समाज यांवर जाणवतो. आपल्या पूर्वजांनाही, ‘कोण देईल धीर माझ्या जिवा?’ असा प्रश्न पडत होताच. त्यासाठी ते, विचारांची नेमकी दिशा सुचवू शकतील, अशा लोकांकडे जात. प्रत्येक काळात, असे असामान्य सभोवताल बदलण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात.
अतुल देऊळगावकर यांना काही विलक्षण व्यक्तींशी संवाद साधता आल्यामुळे ते समृद्ध झाले आहेत. त्यांनी प्रस्तुत पुस्तकात डॉ. नॉर्मन बोरलॉग, डॉ. अमर्त्य सेन, मृणाल सेन, डॉ. सुधीर कक्कर, अनिल अग्रवाल, केशव आणि सुरेंद्र, कुमार केतकर, माधुरी पुरंदरे, भागवत धोंडे आणि जयंत वैद्य अशा विविध क्षेत्रांतील अपूर्व व्यक्तिमत्त्वं आणि त्यांच्या कार्याचा वेध घेतला आहे. या ‘विवेकियांच्या संगती’त, वाचकांच्या विचारांना आणि कृतिप्रवणतेला चालना तर मिळेलच, सोबत ‘वो सुबह हमी से आएगी’ हा विश्वासही प्रबळ होईल, अशी आशा आहे.
Share
