Vivahsanstha, Kutumbsanstha Aani Strimukti By Divakar Mohini (विवाहसंस्था, कुटुंबसंस्था आणि स्त्रीमुक्ती - एक वाद-संवाद)
Vivahsanstha, Kutumbsanstha Aani Strimukti By Divakar Mohini (विवाहसंस्था, कुटुंबसंस्था आणि स्त्रीमुक्ती - एक वाद-संवाद)
Couldn't load pickup availability
दिवाकर मोहनी ह्यांनी १९९२ ते २००१ या काळात ‘आजचा सुधारक’ ह्या मासिकात लिहिलेल्या लेखांचे हे संपादित संकलन आहे. ह्यात मोहनींनी विवाहसंस्था, कुटुंबसंस्था आणि स्त्रीमुक्ती ह्यांसंदर्भात अभिनव मांडणी केली आहे. विवाहसंस्था, कुटुंबसंस्था आणि स्त्रीमुक्ती ह्यांना परस्परांपासून वेगळे करताच येत नाही. किंबहुना, विवाहसंस्था आणि कुटुंबसंस्था ह्यांच्यातील जे नाते आतापर्यंत विविध विचारप्रणालींनी गृहीत धरले आहे, त्यालाच हे पुस्तक छेद देते. स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या व तेवढ्याच नाजूक-निषिद्ध विषयाला ह्या पुस्तकातून मोहनींनी हात घातला आहे. ह्या विचारांवर जी साधकबाधक चर्चा घडली, तिचाही ह्या पुस्तकात समावेश केलेला आहे. मोहनींची मांडणी रूढ विचारांना धक्का देणारी असली, तरी त्यावर विचारविमर्श करण्यास अजूनही जागा आहे. त्यामुळे सुजाण वाचकांनी आपापले पूर्वग्रह दूर ठेवून समाजहिताच्या दृष्टिकोनातून ह्या पुस्तकाचे वाचन, त्यावर चिंतन व मुक्त चर्चा करावी, असे आमचे त्यांना नम्र आवाहन आहे.
Share
