Vikri Vidnyan (विक्री विज्ञान)
Vikri Vidnyan (विक्री विज्ञान)
Couldn't load pickup availability
Vikri Vidnyan (विक्री विज्ञान)
लेखक : आनंद करंदीकर
पाने : 328
आनंद करंदीकर यांचे ‘विक्री विज्ञान’हे पुस्तक अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात निव्वळ माहिती किंवा रुक्षपणे दिलेले सल्ले नाहीत. विक्री विज्ञानाच्या सांगोपांग माहितीला त्यांनी स्वानुभवाची जोड दिलेली आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन उत्पादन करणे, ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, त्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन आवश्यक बदल करून पुन्हा ग्राहकांपर्यंत पोहोचणे ही चक्राकार गती अबाधित ठेवणे उद्योगाच्या वाढीसाठी अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनाइतकीच विक्री महत्त्वाची आहे. विक्रीचे महत्त्व लक्षात घेता विक्री उद्योगाची व्यवसाय म्हणून निवड करण्याचे आवाहनही ते करतात. ग्राहकाशी बोलताना कसे बोलावे आणि कसे बोलू नये हेही प्रांजळपणे सांगतात…
विक्री बरोबरच विक्री संबंधी कायदे, टेंडर भरणे, दुकानाची जागा निवडणे, विक्रीतून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन, बनावटाचा बिमोड, विक्री व्यवसायात स्त्रियांना असणारी संधी तसेच डिजिटल माध्यमातून होणारी विक्री अशा अनेक परिमाणांची चर्चा हे पुस्तक करतं. ही सारी मांडणी करताना टाटा मोटर्स सारख्या प्रचंड उद्योगापासून कबनूर सारख्या छोट्या गावातल्या छोट्या उद्योगापर्यंतचा विशाल पट लेखकाने कवेत घेतला आहे.
फक्त वस्तूच नाही तर विचार व अमूर्त संकल्पनांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या सामाजिक चळवळींनासुद्धा हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. अतिशय सोप्या भाषेत, भरपूर किस्से-कहाण्या सांगत विक्री विज्ञानाची उकल करणारे हे पुस्तक उद्योजकांबरोबरच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामान्यांनाही समृद्ध करेल.
Share
