Vicharanna Navi Disha, Ayushyala Navi Prerana!! 2 Pustakancha Sanch By Pavan Dabade (1% उद्योजक मार्केट. माईड. मोनोपोली + अल्फा खन्या पुरुषार्थाचे गुप्त मॅन्युअल - विचारांना नवी दिशा, आयुष्याला नवी प्रेरणा!! - पवन दबडे)
Vicharanna Navi Disha, Ayushyala Navi Prerana!! 2 Pustakancha Sanch By Pavan Dabade (1% उद्योजक मार्केट. माईड. मोनोपोली + अल्फा खन्या पुरुषार्थाचे गुप्त मॅन्युअल - विचारांना नवी दिशा, आयुष्याला नवी प्रेरणा!! - पवन दबडे)
Couldn't load pickup availability
विचारांना नवी दिशा, आयुष्याला नवी प्रेरणा!!
1% उद्योजक मार्केट. माईंड. मोनोपोली | पवन दबडे
तुम्ही असा खेळ खेळत आहात, ज्याचे खरे नियम तुम्हाला कधीच सांगण्यात आले नाहीत. ज्या बाजारात तुम्ही रोज लढता, तो कुणीतरी आधीच स्वतः साठी डिझाईन करून ठेवला आहे. इथे 99% लोक प्रॉडक्ट विकण्यासाठी घाम गाळतात, तर 1% लोक ग्राहकांच्या इगो आणि भीतीचा वापर करुन शांतपणे 'मोनोपोली' उभी करतात, ते तुमच्यापेक्षा हुशार नाहीत, त्यांना फक्त मार्केटचे 'अदृश्य नियम' दिसतात. "मेहनतीला फळ मिळते" या भाबड्या आदर्शावर जगायचे असेल, तर हे पुस्तक आताच खाली ठेवा. पण जर बिझनेस आणि सायकोलॉजीच्या पडद्यामागचे ते क्रूर वास्तव पचवायची हिंमत असेल... तर हे पुस्तक तुमचा मेंदू मुळापासून हादरवून टाकेल, मार्केट. माईंड. मोनोपोली. कारण 99% लोक हा खेळ फक्त खेळत आहेन, आणि 1% लोक हा खेळ 'चालवत' आहेत
अल्फा खऱ्या पुरुषार्थाचे गुप्त मॅन्युअल - पवन दबडे
पुरुषाला आयुष्यभर "तू फक्त संघर्ष केला पाहिजे!" एवढंच शिकवलं गेलं. पण "हा संघर्ष नेमकं कोणाशी आणि कशासाठी करायचा?" हे मात्र व्यवस्थेने सोयीस्करपणे लपवून ठेवलं; कारण त्यांना राजा नव्हे, केवळ इतरांच्या सोयीसाठी राबणारा गुलाम घडवायचा होता ! परिणामी, स्वतःचा कणा मोडून इतरांसाठी फक्त 'एटीएम' बनून राहिलेल्या त्या प्रत्येक सहनशील पुरुषाला या जगाने फक्त वापरून सोडून दिलं ! वय १६ असो वा ६०, कॉर्पोरेट नोकरी असो वा बिझनेस रणांगण कोणतंही असलं, तरी पैसा, सत्ता, नात्यांमधलं राजकारण आणि गिळलेला अपमान... पुरुषाच्या जखमा आणि त्यांची मुळं शेवटी एकच असतात ! संकटांच्या वादळात कणा ताठ कसा ठेवायचा, यासाठी एका सम्राटाने भावी राजाच्या हाती सोपवलेला हा एक 'गुप्त ग्रंथ' आहे. समाजातल्या अदृश्य चाली, पैशांचं छुपं गणित, घराआडचं सूक्ष्म राजकारण आणि स्वतःवर मिळवलेली अढळ हुकमत... लाचारांच्या गर्दीतून बाहेर पडून, स्वतःला न गमावता स्वतःच्या अटींवर साम्राज्य उभं करण्याचा हा एक मास्टरप्लॅन आहे ! कळपात मान खाली घालून चालणारं लाचार मेंढरू बनायचं, की स्वतःच्या नियमांवर राज्य करणारा 'अल्फा' हा फैसला तुझा आहे. हे पुस्तक आवड नाही; स्वतःच्या अस्तित्वाची आणि पुरुषार्थाची अंतिम 'गरज' आहे !
Share
