Vachun Urnari Pustak By Nitin Vaidya (वाचून उरणारी पुस्तक)
Vachun Urnari Pustak By Nitin Vaidya (वाचून उरणारी पुस्तक)
Couldn't load pickup availability
खिशा-पाकिटातल्या हिरव्या, निळ्या, गुलाबी कागदांपेक्षा काळी अक्षरे. उमटलेल्या पुस्तकाच्या पांढऱ्या कागदावर जास्त प्रेम करणाऱ्या भाग्यवान माणसांच्या जमातीतला एखादा मान्यवर सरदार म्हणून शोभावा अशा नितीन वैद्य यांनी आयुष्यभर पुस्तकांवर अपार प्रेम केलं आणि या ग्रंथ-मैत्राचा अपार अभिमान बाळगला. या अद्भुत मैत्राच्या रानवाटेवर उमललेली सुंदर रानफुले वाटावी अशी सुरेख टिपणे आणि लेख त्यांनी वेळोवेळी लिहून ठेवले. अशा अपार पुस्तकमैत्राने दरवळणारे मोजके लेख म्हणजे ‘वाचून उरणारी पुस्तकं’.
‘पुस्तक संपतं, पण तिथून ते वाचकांच्या मनात सुरू होतं’ यासारखे विचक्षण भाष्य नीतिन नोंदवतात. त्यांचे वाचन भाषांच्या सीमा किती सहज ओलांडतं, याचं अतिशय विदग्ध दर्शन हिमालयविषयक पुस्तकांवरच्या लेखात घडतं.
हिमालय या एकाच विषयावरच्या अनेक हिन्दी पुस्तकांची अतिशय रंजक आणि समृद्ध करणारी ओळख या लेखात करून दिली आहे.
हिन्दी पुस्तकांबाबत अजून सांगायचं तर उदयन वाजपेयी यांच्या मुलाखतवजा संवाद ग्रंथांच्या परिचयातून इतक्या ज्ञानी, चिंतनशील, प्रतिभावंत माणसांचे अद्भुत सुंदर दर्शन नीतिन करून देतात की, ती सर्व पुस्तकं वाचल्याबद्दल आपल्याला त्यांचा हेवा तर वाटायला लागतोच, पण आपण स्वतः ती पुस्तकं कधी एकदा वाचतो असं होतं. ही भावना हेच वैद्य यांच्या या पुस्तकाचं सर्वात मोठं यश आहे.
नीतिन वैद्य यांचं हे दीर्घकाळ पुरणारं, आपल्याला विविध विषयांवरच्या पुस्तकांपर्यंत पोचवणारं आणि वाचून मनात उरणारं मौलिक पुस्तक आहे.
संजय भास्कर जोशी
Share
