Skip to product information
1 of 1

Udhwasta Dharmashala By Govind Purushottam Deshpande (उध्वस्त धर्मशाळा)

Udhwasta Dharmashala By Govind Purushottam Deshpande (उध्वस्त धर्मशाळा)

Regular price Rs. 149.00
Regular price Rs. 175.00 Sale price Rs. 149.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version

मराठी रंगभूमीवरील ‘उध्वस्त धर्मशाळा’ हे सर्वथैव आगळेवेगळे असे नाटक ! गो. पु. देशपांडे यांनी या नाटकातून एका करारी, तत्त्वनिष्ठ मार्क्सिस्ट नेत्याच्या पराभूत थोरवीची गाथा रंगविलेली आहे.
राजकारणामध्ये जी तत्त्वप्रणाली स्वीकारलेली आहे. ती कितीही कालबाह्य व अपयशी ठरो, तिलाच निर्धाराने चिटकून राहण्याची वृत्ती व त्यातून शेवटी निर्माण होणारी अटळ शोकांतिका स्वीकारण्याची जिद्द कुलकर्णी घराण्यात तीन पिढ्यांपासून चालत आलेली आहे. प्रत्येक पिढीची तिची स्वतःची विचारसरणी आहे, ह्या विचारसरणीला सवंग लोकप्रियतेसाठी तत्त्वशून्य तडजोड ठाऊकच नाही. राजकीय तत्त्वप्रणालीची एकच एक धार तिन्ही पिढ्यांत हस्तांतरित होईल असेही नाही. ‘बापसे बेटा सवाई’ या न्यायाने बापापेक्षा बेट्याचे तत्त्वज्ञान वेगळेच आढळते. स्वीकारलेल्या तत्त्वाशी प्रामाणिकता एवढी कणखर, की नाटकामध्ये पित्याच्या प्रचारसभा पुत्र उधळून लावीत असल्याचे उल्लेख आढळतात. राजकीय ध्येयाच्या प्राप्तीसाठी तत्त्वच्युत झालेल्या व प्रस्थापितांच्या कळपात जाऊ पाहणाऱ्या आपल्या पत्नीकडून अथवा प्रेयसीकडून अव्हेरले जाण्याची तयारीही कुलकर्णी कुटुंबातील दोघांनी दाखवली आहे. समान राजकीय विचारसरणीच्या धाग्यांनी दोन जीव एकत्र येतात आणि त्या ध्येयाच्या मार्गात तडजोडीची अपरिहार्य वेळ आली, की हे दोन पुरुष आपल्या साथीदारीणींचा कायमचा निरोप घेतात. बापाची शोकांतिका तीच मुलाची !
रंगभूमीवरील अनेक लोकप्रिय नाटकांच्या प्रकृतिधर्माशी ह्या नाटकाचे नाते जुळणारे असूनदेखील हे नाटक विशेष यशस्वी झाले नाही; त्याचे कारण ह्या नाटकातील निखळ वैचारिकता. रंगभूमीवरील ह्या नाटकाचे व्यावसायिक अपयश गृहीत धरूनही ह्या नाटकाने महाराष्ट्राच्या वैचारिक जगात खळबळ माजविलेली आहे. निखळ वैचारिक नाटके मराठीत तशी दुर्मीळच !

ह. म. धोडके
(समाज प्रबोधन पत्रिका, मे जून १९७६ मधून संकलित

View full details