Tukobaraya By Kiran Mane (तुकोबाराया)
Tukobaraya By Kiran Mane (तुकोबाराया)
Couldn't load pickup availability
कलावंतांनी शक्यतो भूमिका घ्यायचीच नाही, चुकून घेतलीच तर ‘हाही छान, तोही छान’ असा आशाळभूत बोटचेपेपणाच करायचा, असा लाचार काळ बोकाळला आहे. त्यात सुस्पष्ट आणि खणखणीत भूमिका घेऊन प्रसंगी सत्तेच्या विरोधात बेडरपणे उभा ठाकणारा, त्यासाठी पडेल ती किंमत मोजणारा, मेंदूगहाण ट्रोल्सच्या झुंडी अंगावर घेऊन साता समुद्रापार भिरकावून देणारा मराठीतला खराखुरा ‘अँग्री यंग मॅन’ म्हणजे किरण माने.
नुसताच अभिनेता नाही, तर चौफेर टोलंदाजी करणारा फर्डा वक्ता आणि फेसबुकवरच्या एकेका पोस्टमधून लोकांना एकीकडे शब्दांच्या तालावर डोलवत दुसरीकडे त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा एक प्रखर सामाजिक भान बाळगणारा लेखक. आपल्या धडावर आपलंच डोकं बाळगणाऱ्या किरण मानेंची वैचारिक नाळ जुळली आहे ती आपल्या काळातील ‘अँग्री यंग मॅन’च असलेल्या, दांभिक व्यवस्थेवर शब्दांचे आसूड ओढणाऱ्या तुकोबारायांशी. म्हणूनच तुकोबांच्या एरवी सर्वपरिचित असलेल्या अभंगांचीही ओळख माने वेगळ्याच प्रकारे करून देतात. टाळकुटे, परमार्थी संत अशी सगळ्याच वारकरी संतांची मतलबी मांडणी करणाऱ्या पोटार्थी परंपरेला धुडकावून, या अभंगांवर झळझळीत प्रकाश टाकतात. ही तुकोबांची ‘शुद्ध बुद्ध काया’ रूप महाप्रतिमा उभी करणारी मांडणी तुकोबांच्या विद्रोही परंपरेचाच वारसा अभिमानाने पुढे चालवते आणि वाचकांना तुकोबाराया नव्याने भेटवते.
मुकेश माचकर
Share
