Skip to product information
1 of 3

Tukobanche 51 Preranadayi Sutre! + Shrikrishnaniti By Navnath Jagtap (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे + श्रीकृष्णनीती)

Tukobanche 51 Preranadayi Sutre! + Shrikrishnaniti By Navnath Jagtap (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे + श्रीकृष्णनीती)

Regular price Rs. 423.00
Regular price Rs. 498.00 Sale price Rs. 423.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

1) तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे । लेखक - नवनाथ जगताप 
पाने - ३५२ - 299/-

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ नसून, ते मानवी मनाचा अचूक ठाव घेणारे एक महान युगपुरुष आहेत. शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही आपल्याला अंधारात प्रकाशाची वाट दाखवतात. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जगात शांत व समाधानी आयुष्य कसे जगावे? याचे उत्तम मार्गदर्शन तुकोबांच्या गाथेत आढळते. याच कालातित विचारांचे सार अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत मांडणारे पुस्तक म्हणजे 'तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे'.

हे पुस्तक म्हणजे केवळ अभंगांचे संकलन नसून, ती आनंदी आणि यशस्वी जीवनाची एक गुरुकिल्ली आहे. कठीण प्रसंगात खचून न जाता हिंमतीने कसे उभे राहावे?, माणसांची पारख कशी करावी?, नातेसंबंध कसे जपावेत? आणि व्यवहारात सत्य व नीतिमत्ता कशी ठेवावी? हे या ५१ सूत्रांमधून उलगडते. तुकाराम महाराजांचे रोखठोक आणि वास्तववादी विचार आजच्या आधुनिक जीवनशैलीशी जोडून वाचकांना सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक केवळ वारकरी किंवा भक्तांसाठी नाही, तर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि गृहिणी अशा प्रत्येकासाठी आहे. नैराश्य दूर करून मनात आत्मविश्वासाचा आणि चैतन्याचा दिवा लावणारे, जगण्याची नवी उमेद देणारे हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवे.

2)श्रीकृष्णनीती: प्रेरणांचा अखंड स्रोत - काल, आज आणि उद्या | लेखक - नवनाथ जगताप
पाने - १४४- 199/-

कुरुक्षेत्रातील रणभूमीवर गूढ हास्य करणारा, गोकुळातील गोपालकृष्ण, आणि धर्मसंघर्षात न थकणारा नीति-सामर्थ्याचा आधार — श्रीकृष्ण!
त्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात लपलेली अमर नीती आजही मानवजातीला प्रेरणा देते.
श्रीकृष्णनीती हे पुस्तक केवळ गीतेपुरते मर्यादित न राहता, बाललीला, कंसवध, गिरीधर रूप, रुक्मिणीहरण, महाभारतातील रणनीती, शांतिदूताची भूमिका, सुदामा भेट, आणि धर्मसंस्थापनेच्या अद्भुत कार्यापर्यंतचा विस्तृत जीवनप्रवास उलगडते.
कधी बाळ कृष्ण, कधी रणनायक, कधी मुत्सद्दी — या भूमिकांतून धैर्य, चातुर्य, योग्य निर्णय, संकटप्रतिकार आणि मूल्यनिष्ठा शिकवणारा श्रीकृष्ण आपल्या जीवनातही निर्णायक बनण्याची प्रेरणा देतो.

आजच वाचा कृष्णनीती हे पुस्तक आणि श्रीकृष्णासारखे धैर्यवान, बुद्धिमान व नीतिमान व्हा!


View full details