Skip to product information
1 of 1

Triveni Prerana Sanch By Navnath Jagtap (त्रिवेणी प्रेरणा संच - नवनाथ जगताप )

Triveni Prerana Sanch By Navnath Jagtap (त्रिवेणी प्रेरणा संच - नवनाथ जगताप )

Regular price Rs. 642.00
Regular price Rs. 642.00 Sale price Rs. 642.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Author
Publication
Language version
Quantity

तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे भाग १ | पाने - ३५२
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ नसून, ते मानवी मनाचा अचूक ठाव घेणारे एक महान युगपुरुष आहेत. शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही आपल्याला अंधारात प्रकाशाची वाट दाखवतात. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जगात शांत व समाधानी आयुष्य कसे जगावे? याचे उत्तम मार्गदर्शन तुकोबांच्या गाथेत आढळते. याच कालातित विचारांचे सार अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत मांडणारे पुस्तक म्हणजे 'तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे'.

श्रीकृष्णनीती: प्रेरणांचा अखंड स्रोत - काल, आज आणि उद्या | पाने - १४४
कुरुक्षेत्रातील रणभूमीवर गूढ हास्य करणारा, गोकुळातील गोपालकृष्ण, आणि धर्मसंघर्षात न थकणारा नीति-सामर्थ्याचा आधार — श्रीकृष्ण!
त्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात लपलेली अमर नीती आजही मानवजातीला प्रेरणा देते.
श्रीकृष्णनीती हे पुस्तक केवळ गीतेपुरते मर्यादित न राहता, बाललीला, कंसवध, गिरीधर रूप, रुक्मिणीहरण, महाभारतातील रणनीती, शांतिदूताची भूमिका, सुदामा भेट, आणि धर्मसंस्थापनेच्या अद्भुत कार्यापर्यंतचा विस्तृत जीवनप्रवास उलगडते.
कधी बाळ कृष्ण, कधी रणनायक, कधी मुत्सद्दी — या भूमिकांतून धैर्य, चातुर्य, योग्य निर्णय, संकटप्रतिकार आणि मूल्यनिष्ठा शिकवणारा श्रीकृष्ण आपल्या जीवनातही निर्णायक बनण्याची प्रेरणा देतो.

चाणक्यनीती चाणक्यसूत्रांसहित | पाने - १२० 
  
विष्णुगुप्त चाणक्यसारखे अनोखे व्यक्तीमत्व सहस्त्र वर्षातून  कधीतरी जन्माला येते. अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले  आर्य चाणक्य यांनी  आपल्या विद्वतेच्या व नीतिच्या जोरावर प्राचीन काळात अखंड भारताचे स्वप्न उरी बाळगले. चंद्रगुप्त मौर्यसारख्या हरहुन्नरी राजपुत्राची निवड करुन या स्वप्नाला मूर्त रुप दिले. चक्रवर्ती सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात प्रधान पदी विराजमान असतानाही गवताच्या साध्या झोपडीत ते राहत असे. राज्याच्या  एखाद्या  गूढ समस्येवर उपाय शोधण्यासाठी काळ्याकुट्ट अंधारात स्वतःला कोंडून घेत असत.जेव्हा झोपडीचा दरवाजा उघडत असे तेव्हा जणू काही  काळ्याकुट्ट अंधारावर विजय मिळवणारा प्रकाशच बाहेर पडावा अशाप्रकारे  समस्येवरील रामबाण उपाय शोधूनच ते बाहेर येत .

 

View full details