Ti Ani Itar Kahi By Milind Gadgil (ती आणि इतर काही )
Ti Ani Itar Kahi By Milind Gadgil (ती आणि इतर काही )
Couldn't load pickup availability
'हास्यरंगी रंगले' आणि 'लाफ्टर मॉल' या दोन विनोदी लेखसंग्रहांच्या पुस्तकानंतर 'ती आणि इतर काही' हा माझा पहिलाच कवितासंग्रह प्रसिद्ध होत आहे. आयुष्यात काही घटना अशा घडून जातात काही प्रसंग असे येतात किंवा काही व्यक्ती अशा प्रवेश करतात की आपोआप शब्दांना नादमय रूप प्राप्त होते. सदर कवितासंग्रहात ' ती ' या अक्षराच्या संदर्भात अनेक नात्यांमधून व्यक्त होणारी कोणतीही स्त्री येऊ शकते आणि तीव्र भावना आपोआप शब्दबद्ध होतात तसेच 'इतर काही' या दोन शब्दांच्या अंतर्गत मनाला विविध भावलेले किंवा खटकलेले प्रसंग, व्यक्ती यांचं वर्णन यातल्या काही कवितांमध्ये आहे. प्रेम ,भक्ती, श्रद्धा ,दुःख ,निराशा, आनंद अशा विविध भावछटा घेऊन शब्द प्रत्येक पानावर उतरले आहेत आणि ते रसिकांच्या मनात उतरले आणि त्यांना भावले तर कवितासंग्रह प्रकाशित झाल्याचा आनंद अधिक वाढीस लागेल.
Share
