Thor Sangeetkar By B. R. Deodhar (थोर संगीतकार)
Thor Sangeetkar By B. R. Deodhar (थोर संगीतकार)
Couldn't load pickup availability
पाने - ३२२
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळा’चे माजी कार्याध्यक्ष आणि पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य बी. आर. देवधर यांनी लिहिलेल्या ‘थोर संगीतकार’ या पुस्तकाची ही नवीन आवृत्ती.
‘गांधर्व महाविद्यालय मंडळा’च्या ‘संगीतकलाविहार’ या मासिकाचे संपादक म्हणून काम करताना प्रत्येक महिन्याच्या अंकासाठी एका थोर संगीतकाराचे व्यक्तिचित्र देवधरांनी लिहिले. त्यांतील निवडक एकवीस व्यक्तिचित्रे ह्या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.
या लेखांतील लिखाण इतके पारदर्शी आहे की त्यातून प्रत्येक संगीतकाराचे व्यक्तिमत्त्व आपल्या नजरेसमोर स्पष्ट होते. ध्वनिमुद्रिका, पत्रव्यवहार इत्यादी पुराव्यांच्या अभावी या संगीतकारांची कामगिरी दाद न मिळता इतिहासाच्या ओघात कदाचित वाहून गेली असती. छोटेखानी मांडलेल्या या चरित्रांमुळे भारतीय संगीताचा
इतिहास लिहिण्यास एक निकोप साधन मिळाले आहे. पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, पं. वि. ना. भातखंडे, पं. भास्करबुवा बखले, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, सूरश्री केसरबाई केरकर, खाँसाहेब बड़े गुलामअलीखौं, पं. भोलानाथ भट्ट, खाँसाहेब अल्लादियाखौँ यांसारख्या मान्यवरांची चरित्रे म्हणजे त्या विशिष्ट कालावधीतील संगीतमय इतिहासाची ओळखच !
Share
