The Silk Route Spy By Enakshi Sengupta (द सिल्क रूट स्पाय)
The Silk Route Spy By Enakshi Sengupta (द सिल्क रूट स्पाय)
Couldn't load pickup availability
१९२० सालचा भारत… ब्रिटिश राजवटीविरोधात स्वातंत्र्य चळवळीचं वारं देशभरात जोरात वाहत होतं. त्यामुळे चिंताग्रस्त ब्रिटिशांनी स्थानिक तरुणांना हेर म्हणून कामावर ठेवण्यास सुरुवात केली. त्यांच्यात होता नंदलाल कपूर. हेरगिरीचं प्रशिक्षण घेतल्यावर तो वेगवेगळ्या मोहिमांकरता देशभर फिरला. तेव्हा स्वातंत्र्य चळवळीतल्या क्रांतिकारक गटांशी त्याची भेट झाली. त्यांच्याशी बोलल्यावर, चर्चा केल्यावर त्याने ठरवलं की, आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपणही थोडा हातभार लावावा. आणि तो ‘डबल एजंट’ झाला! मग कलकत्त्यातल्या गल्लीबोळांपासून शांघायमधल्या भयंकर क्रूर ‘ग्रीन गँग’पर्यंत, बर्मातल्या सोनेरी पॅगोडांपासून जपानमधल्या टी-हाऊसपर्यंत, नंदलालच्या जीवन-प्रवासाने अनेक धोकादायक आणि अनिश्चित अशी वळणं घेतली..
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या अनेक नायकांच्या कथा सांगितल्या जातात, पण काही नायक असेही असतात जे दुर्लक्षित राहतात, त्यांचा त्याग विस्मृतीत जातो.
अशाच एका नायकाच्या आयुष्याची ही सत्यकथा… द सिल्क रूट स्पाय !
Share
