Tathapi By Dasoo Vaidya (तथापि)
Tathapi By Dasoo Vaidya (तथापि)
Couldn't load pickup availability
“अव्यक्तातलं शब्दात पकडणं हा चमत्कार नसला तरी साधना मात्र आहे. मुळात व्यक्त व्हावं वाटणं हा माणसाचा स्थायीभाव आहे… कवी जेव्हा लिहीत नसतो तेव्हाच लिहीत असतो. आणि प्रत्यक्षात लिहीत असतो तेव्हा फक्त कागदावर उतरवत असतो. द्रवरूप मानसिकतेतून मन कायम गर्भार असतं. त्यामुळं ज्या दिवसाच्या झोळीत कवितेचं दान पडलं तो दिवस विशेषच!”… म्हणूनच दासूंनी ‘तथापि’ हा कविता संग्रह कविता न सुचलेल्या दिवसांना अर्पित केला आहे.
या संग्रहातील दासूंची अभिव्यक्ती ही स्त्रीविषयक जाणिवांची, बदलत्या काळातील घडल्या-बिघडल्या सामाजिक-राजकीय संस्कृतीची, पर्यावरणाची, सभोवाराची, वैयक्तिक भावविश्वातील हळवेपणाची आहे. या साऱ्याची साध्या-सहज शब्दांत नोंद घेत ‘तूर्तास’ आणि ‘तत्पूर्वी’ यांनंतर आता ‘तथापि’ हा तिसरा कविता संग्रह वाचकांच्या भेटीस आला आहे.
Share
