Tappuchya Goshti By Faruk Kazi (टप्पूच्या गोष्टी २)
Tappuchya Goshti By Faruk Kazi (टप्पूच्या गोष्टी २)
Couldn't load pickup availability
मी कोण?
मी आहे टप्पू… ‘उडाणटप्पू’वाला टप्पू नाही काही… खराखुरा टप्पू ऊर्फ टप्या, टपक्या. माझं वय सहा. माझ्या घरचे मला मोठ्या शाळेत पाठवणार आहेत, कारण मला घरी ठेवणं त्यांना परवडणार नाय…
माझ्या घरात असते माझी आज्जी, बाबा, मम्मी आणि दिदाडी कार्टून’ म्हणजे माझी बहीण कोमल… मला की नाही, खूप खूप प्रश्न पडतात… म्हणजे बघा है…
पक्षी इतके उंच उडतात… मग ते बसतात का आभाळावर ?
आज्जीच्या काळातली भूतं आता कुठे असतील? ती माझ्या आणि दिदाडीपेक्षाही डेंजर असतील ?
वर्गातल्या मुक्ताला बोलता आणि ऐकता का बरं येत नसेल? आणि मग तरीसुद्धा ती इतकी छान हसरी नि आनंदी कशी काय बरं राहत असेल?
पहिलीत गेलं म्हणजे काय सायकल यायलाच हवी काय? आणि नाय आली सायकल तर, काय घरी बसायचं?
माणसं मेल्यावर कुठे जातात? दादा म्हणतो, मेल्यावर माणसं मनात राहतात… एवढी मोठी माणसं मनात कशी काय मावतात ?
अशा सगळ्या डेंजर प्रश्नांची उतरं शोधायला आणि आज्जीला विचारायला मला फार आवडतं. आणि मग त्याच्या गोष्टी बनवून सांगायला तर अजूनच आवडतं… तुम्हाला सांगू का मी माझ्या भारी भारी गोष्टी… माझ्या घरामधल्या, शाळेमधल्या, दोस्तांमधल्या आणि मनामधल्या ?
सांगू म्हणता ? चला तर मग… वाचूयात ‘टप्पूच्या गोष्टी’…
एकूण २१ कथा… तीन भागांत
Share
