Swabhavala Aushadh Ahe By Rama Marathe ( स्वभावाला औषध आहे)
Swabhavala Aushadh Ahe By Rama Marathe ( स्वभावाला औषध आहे)
Couldn't load pickup availability
‘काय करणार त्यांचा स्वभावच मुळात नऊ, कोणाला काही म्हणणार नाहीम.’, ‘लहानपणापासूनच हट्टी आहे ती,’ ‘त्याला स्वत:चे असे मतच नसते, दुसरा म्हणेल ती पूर्व दिशा, स्वभावाला औषध नाही हेच खरे!’
सुसंगत तर्कसंगत विचार चांगल्या परिणामांना व उत्तम आयुआरोग्यास कारणीभूत ठरणार, तर चुकीचे विचार अनारोग्य व दुष्परिणाम ओढवून आणणार हेही ओघाने आलेच. मग अशावेळी ‘स्वभावाला औषध’ सापडले तर? असे झाले तर संपूर्ण चित्रच पालटून जाईल.
ही किमया कशी होते हे सांगण्यासाठीच डॉ. रमा मराठे यांनी ‘स्वभावाला औषध आहे. मनोजन्य कारणांमुळे उद्भवलेले शारीरिक आजार हे केवळ वरवरची औषधे घेऊन बरे होत नाहीत, तर त्यासाठी पुष्पौषधींचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो हे सत्य आता अनेक वैद्यकशाखांनी उदारपणे स्वीकारले आहे. हेच सत्य वाचकांसमोर प्रभावीपणे आणण्याचे काम डॉ. मराठे यांनी केले आहे.
सध्या सभोवतालच्या सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा चालू आहे. त्यामुळं अनेक जण चिंतेनं आणि काळजीनं ग्रासलेले आहेत. यामुळं मानसिक व्यथा आणि विकार उद्भवतातच; पण ज्यांना सायकोसोमॅटिक डिसीजीस् (Psycho-somatic Diseases म्हणून संबोधलं जातं, असे शारीरिक विकारही यातून उद्भवतात.
मानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम होऊन उद्भवणारे विकार म्हणजे दमा, पेप्टिक अल्सर, मधुमेह, हृदयरोग, अतिसार, मलावरोध, अल्सरेटिव्ह कोलायटिस, अतिरक्तदाब, संधिवात, नाना प्रकारचे त्वचारोग, मासिक पाळीसंबंधी तक्रारी इत्यादी.
मानसिक तणावामुळं हे विकारवाढीला लागतात आणि मानसिक स्थिती सुधारल्यास हे आजार बरे होण्यास आत्यंतिक मदत होते. विकृत मन:स्थिती, मानसिक रोग व तदानुषंगिक शारीरिक विकार यावर डॉ. बाख यांनी प्रदीर्घ संशोधनाअंती सिद्ध केलेल्या पुष्पौषधींचा रामबाण इलाज होतो. केवळ शारीरिक तक्ररींसाठीही ही औषधं उपयोगात आणली जातात. परंतु त्यांची योजना मात्र त्या वेळच्या विशिष्ट मानसिक लक्षणांवरून करण्यात येते.
पुष्पौषधी या नवीन उपचार-पद्धतीचं विस्तृत विवरण करणारं मराठीतील हे पहिलंच पुस्तक म्हणावं लागेल.
Share
