Skip to product information
1 of 1

Suvicharatun Mashanti Kade By R.R.Jambhekar (सुविचारतून मन : शांतिकडे-रा. रा. जाभेकर)

Suvicharatun Mashanti Kade By R.R.Jambhekar (सुविचारतून मन : शांतिकडे-रा. रा. जाभेकर)

Regular price Rs. 25.00
Regular price Rs. 25.00 Sale price Rs. 25.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

'सुविचारांतून मनःशांतीकडे' हा विषय दृष्टीपुढे ठेवून श्री. रा. रा. जांभेकर यांनी सुविचार लिहिले आहेत, ते वाचकांची मनःशांती वाढविण्यास उपयुक्त ठरतील असेच निवडले आहेत. कोणतेही सुभाषित रत्नासारखे मौल्यवान असते. संस्कृत साहित्यकारांनी सुभाषिताला रत्नाची उपमा देताना त्याचे मानवी जीवनातील महत्त्वही सांगितले आहे. पृथिव्यां त्रीणी रत्नानि जलम् अन्नम् सुभाषितम्। पृथ्वीवरील तीन रत्ने म्हणजे पाणी, अन्न, आणि सुभाषित होयः अशा शब्दात संस्कृत साहित्यकारांनी हे महत्त्व वर्णिले आहे. अशी चांगली सुभाषिते किंवा सुविचार म्हणजे माणसांच्या पिढ्यान् पिढ्या साचलेल्या अनुभवांच्या खाणीच असतात.  श्री. रा. रा. जांभेकर यांनी त्यांच्या सुविचारांचा संग्रह या पुस्तिकेत केलेला आहे. एका अर्थाने ही पुस्तिका म्हणजे दैनंदिन चिंतनिका स्वरूपाची आहे. संग्रहित विचार, केवळ विचारवंतांच्या चिंतनाचे संकलन नसून श्री. जांभेकर यांना त्यांच्या व्यासंगातून, अनुभवातून जे विचार स्फुरले, त्यांचा संग्रह त्यांनी येथे केलेला आहे; आणि चिंतनाचे स्वरूपही मनःशांतीकडे नेणारे आहे. तथापि मनःशांती मिळाली नाही तरी संतापून न जाता संयमाने जीवन जगण्याचा विचारही येथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनःशांतीचे मोती या जगात अपवादानेच मिळतातः असा वास्तव अनुभव सांगण्याचा मोकळेपणा व धारिष्ठ्यही लेखकाने दाखविले आहे. 'शैले शैले न माणिक्य' हा अपवादस्वरूप सिद्धांत तत्त्वज्ञ जो सांगतात. पाने 50

View full details