Suvichaar Aani Thor Vyaktinche Vichar By Pramila Modak (सुविचार आणि थोर व्यक्तींचे विचार दर्शन - श्रीमती परमिळ मोडक)
Suvichaar Aani Thor Vyaktinche Vichar By Pramila Modak (सुविचार आणि थोर व्यक्तींचे विचार दर्शन - श्रीमती परमिळ मोडक)
Couldn't load pickup availability
माणसाचा विचार करण्यात वेळ जातो. त्यातून निश्चित असे काहीच मिळत नसते. परंतु सुविचार मनात आल्याने मनात आनंद निर्माण होतो. निर्भयता प्राप्त होत असते. सुविचारांमध्ये फार मोठी शक्ती असते. काय करावयास हवे? काय नको? हे निश्चित कळत असते. अंधारातून प्रकाशाकडे वाट मिळत असते. मार्ग सापडतो.
थोर व्यक्तींचे विचारदर्शन -
यामधून निरनिराळ्या संतसञ्जन, थोर, विद्वान, अभ्यासू व्यक्ती, कवी, लेखक यांनी आपल्या अनुभवांतून विचार सांगितलेले असतात. त्यांचे बोलही अत्यंत महत्त्वाचे असतात.
सुविचार व थोर व्यक्तींचे विचार-दर्शन यांचा या पुस्तकात संग्रह केलेला आहे.
शिक्षकांना शाळांमधून विद्यार्थ्यांना सुविचार तसेच थोर व्यक्तीचे विचार सांगावे लागतात.
दररोज वर्गात फळ्यावर एखादा सुविचार किंवा थोर व्यक्तींचे विचार लिहिलेले असावेत.
सभासंम्मेलन, वक्तृत्व सभा किंवा स्पर्धा यांमध्ये आपले विचार सांगताना, भाषण करताना विद्यार्थ्यांनाही याचा उपयोग होतो. निबंध लिहितानाही माहिती लिहिता येते.
याशिवाय काही वेळेस सुविचार व थोर व्यक्तींचे विचार वाचल्याने मनालाही आनंद मिळतो, करमणूक होते व निराश मनालाही दिलासा मिळतो.
पालकांचा आपल्या मुलांना घडविण्यात हातभार असतोच. त्यामुळे पालक, शिक्षक व विद्यार्थी या सर्वांना उपयोगी होईल असेच हे संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक आहे.
"सुविचार व थोर व्यक्तींचे विचार-दर्शन" संग्रह असलेले हे पुस्तक अभिषेक प्रकाशन, पुणे यांनी प्रसिद्ध केले याबद्दल त्यांचे आभार मानत आहे.
पाने 38
Share
