Srujanachi Waat By Sandeep Wakchoure (सृजनाची वाट)
Srujanachi Waat By Sandeep Wakchoure (सृजनाची वाट)
Couldn't load pickup availability
असे म्हणतात की, जोपर्यंत मूलभूत परिवर्तन होत नाही तोपर्यंत वरवर दिसणार्या बदलांना फारसा अर्थ उरत नाही. जर खरे समाज परिवर्तन घडवायचे तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण म्हणजे जे शाळेत दिले जाते तेवढेच, अशी याची संकुचित व्याख्या नाही. जीवन जगण्यासाठी, एक चांगला माणूस म्हणवून घेण्यासाठी, देशाचा आदर्श नागरिक होण्यासाठी जे गुण अंगी असावे लागतात ते जाणून घेणे, आचरणात आणणे म्हणजे शिक्षण! असे शिक्षण मिळावे यासाठी आम्ही ‘शिक्षण विचार’ घेऊन काही पुस्तके प्रकाशित करायचे ठरवले. सुप्रसिद्ध साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे यांनी ही कल्पना मांडली आणि स्वतःच ते शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललेही. त्यामुळेच एक लेखक, एक प्रकाशक आणि एकच विषय या कल्पनेतील तब्बल बारावे पुस्तक वाचकांच्या भेटीस येत आहे. या पुस्तकातून त्यांनी ‘सृजनाची वाट’ दाखवली आहे.
Share
