Skip to product information
1 of 1

Sindhi By Rohini Tukdeo, Onkar Thorat (सिंधी - रोहिणी तुकेदेओ, ओंकार थोरात )

Sindhi By Rohini Tukdeo, Onkar Thorat (सिंधी - रोहिणी तुकेदेओ, ओंकार थोरात )

Regular price Rs. 382.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 382.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

जिच्याशी तुमचं सारं आयुष्य सर्वार्थाने बांधलं गेलेलं असतं, त्याच 

भूमीतून अचानक उखडून फेकलं जातं आणि एका क्षणात होत्याचं 

नव्हतं होतं. तेव्हा समोर सर्वत्र नुसता अंधार पसरतो. जगण्याचे सारे 

मार्ग बंद होतात. कुठे जावं, काय करावं आणि कसं जगावं असे 

अनेक प्रश्न समोर उभे ठाकतात. तरीही जगण्याची धडपड सुटत 

नाही. रडतखडत, ठेचकाळत का होईना धडपड चालू राहते आणि 

एक वेगळं विश्व नव्यानं साकारते. त्याचीच ही कहाणी आहे.

खरंतर ही कहाणी आहे सिंधी समूहाची. ज्यांनी फाळणीची दाहकता 

अनुभवली, अचानक उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या स्थलांतराची वेदना 

अनुभवली, त्यानंतरची विस्थापितांच्या वाट्याला येणारी आयुष्याची 

फरफट आणि ससेहोलपट अनुभवली अशा सिंधी समूहाची ही कहाणी 

आहे. यात व्यथा आहेत, वेदना आहेत, विरहाचं दुःख आहे, जगणं उद्ध्वस्त 

झाल्याची आणि परिणामी सारं काही गमावल्याची तीव्र सल आहे. 

असं असूनही त्यात दुःखाला कवटाळून बसण्याचं भावनाशून्य गोठलेपण 

नाही, तर यातून बाहेर पडण्याची सजगपणे केलेली धडपड आणि नवी 

मूल्ये अंगीकारत नव्यानं उभं राहत वेगळी ओळख निर्माण करण्याची 

उमेद आहे.

View full details